नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : भारतीय महिला हॉकी टीमला (Indian women's hockey team) सातत्यानं प्रोत्साहन (motivation) देणाऱ्या शाहरूख खानचे (Shah Rukh Khan) टीमचे कोच शोर्ड मारिन (Sjoerd Marijne) यांनी आभार मानले आहेत. आता ‘चक दे-पार्ट 2’ (Chak De Part 2) बनवायची वेळ झाली आहे, असं ट्विट मारिन यांनी केलं आहे.
टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीबद्दल या टीमला प्रोत्साहन मिळत आहे. आतापर्यंत महिला हॉकी टीमची ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचं मानलं जात आहे. भारतीय महिला हॉकी टीमच्या प्रत्येक विजयानंतर त्यांचं अभिनंदन करणारा आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अभिनेता शाहरूख खानचं हॉकीसोबत एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच टीमच्या पराभवनानंतर शाहरूख खाननं केलेलं ट्विट चर्चेचा विषय ठरलंय. मनाला वाईट वाटलं असलं तरी आपली मान अभिमानानं उंचावली असल्याचं त्यानं या ट्विटमध्ये म्हटलं होतं. भारतीय टीमनं उत्तम खेळ केला. त्यामुळे भारतातील अऩेकांना प्रेरणा मिळाल्याचं ट्विट शाहरूख खाननं केलं होतं.
Heartbreak!!! But all reasons to hold our heads high. Well played Indian Women’s Hockey Team. You all inspired everyone in India. That itself is a victory.
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 6, 2021
त्यावर आता भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी उत्तर दिलं आहे. आपण दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ‘चक दे-पार्ट 2’ बनवण्याची वेळ झाली असल्याचं म्हटलं आहे. आपल्याला काय वाटतं, असा सवालही त्यांनी शाहरूख खानला विचारला आहे.
Thank you @srk for all the love ! It's great to have support from the best in Bollywood. It's time for Chak De part 2, what say? 😊 https://t.co/ikJQv3VjdL
— Sjoerd Marijne (@SjoerdMarijne) August 6, 2021
हे वाचा -Tokyo Olympics : दीपक पुनियाच्या सामन्यानंतर मोठा वाद, कोचला काढलं बाहेर
चक दे इंडिया
शाहरूख खाननं 2007 साली प्रदर्शित झालेल्या चक दे इंडिया या सिनेमात भारतीय महिला हॉकी टीमच्या प्रशिक्षकाची भूमिका केली होती. कबीर खान हे पात्र त्यानंतर भारतासह अनेक देशांत लोकप्रिय झालं होतं. तेव्हापासनच शाहरूख खानचा हॉकीशी संबंध अधिक दृढ झाला असून भारतीय हॉकी संघाबद्दल तो वारंवार ट्विट करून त्यांना प्रोत्साहन देत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hockey, Shah Rukh Khan