मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

एका होकारासाठी 6 वर्ष ‘या’ सुंदर खेळाडूचा पाठलाग करायचा इशांत शर्मा

एका होकारासाठी 6 वर्ष ‘या’ सुंदर खेळाडूचा पाठलाग करायचा इशांत शर्मा

आपल्या वैयक्तिक आयुष्यात इशांत जितका शांत आणि तेवढाच रोमँटिकही आहे.

आपल्या वैयक्तिक आयुष्यात इशांत जितका शांत आणि तेवढाच रोमँटिकही आहे.

आपल्या वैयक्तिक आयुष्यात इशांत जितका शांत आणि तेवढाच रोमँटिकही आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 16 मार्च : भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मैदानावर फलंदाजीची दांडी गूल करण्यासाठी ओळखला जातो. मात्र मैदानाबाहेर इशांतचे एक वेगळेच रुप पाहायला मिळते. आपल्या वैयक्तिक आयुष्यात इशांत जितका शांत आणि तेवढाच रोमँटिकही आहे. इशांत शर्माने आपल्या लव्ह लाईफबद्दल जास्त सांगितले नसले तरी, एका होकारासाठी त्याला 6 वर्ष सुंदर मुलीचा पाठलाग करावा लागला होता. ही सुंदर मुलगी भारताची स्टार बास्केटबॉलपटूही आहे. सहा वर्षांनी इशांतने याच खेळाडूची लग्नही केले. या खेळाडूचे नाव आबे प्रतिमा सिंह.

दिल्लीतील एका बास्केटबॉल स्पर्धेदरम्यान इशांत प्रतिमा भेटला, आणि त्यांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. इशांतने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या लव्हस्टोरीबाबत सांगितले. प्रतिमा इशांत क्रिकेटर असल्यामुळे त्याच्यावर जळायची, मात्र त्यानंतर तिला त्याचा अभिमान वाटू लागला.

बास्केटबॉल कोर्टवर पडला प्रेमात

फारच थोड्या लोकांना माहिती आहे की ईशांतची पत्नी प्रतिमा भारतासाठी बास्केटबॉल खेळली आहे. त्यांची पहिली भेटही बास्केटबॉल कोर्टवर झाली होती. इशांतच्या मित्राने बास्केटबॉल स्पर्धा आयोजित केली होती ज्यात इशांतची पत्नी प्रतिमा तिन्ही बहिणींसोबत आली होती. याच स्पर्धेसाठी इशांत प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. बघताच क्षणी तो प्रतिमाच्या प्रेमात पडला. यानंतर इशांतने तिचा नंबर मिळवला आणि त्यांची मैत्री झाली. एका वर्षानंतर इशांतने आपल्या प्रेमाची कबुली दिली. पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी 9 डिसेंबर 2016 रोजी लग्न केले.

असे आहे इशांतचे करिअर .

इशांत शर्माकडे कसोटी सामन्यांचा जास्त आहे. त्याने भारतासाठी 96 कसोटी सामने खेळले आहेत. यात 292 विकेट घेतल्या आहेत. नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या 5 कसोटी सामन्यात इशांतने 23 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या दोन वर्षांच्या विक्रमाबद्दल बोलायचे तर ईशांत शर्माची कामगिरी अप्रतिम आहे. इशांत शर्माने 15 कसोटीत अवघ्या 19.53 च्या सरासरीने 58 विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने 78 धावा देऊन 9 विकेट घेतल्या होत्या.

First published:

Tags: Cricket