नवी दिल्ली, 28 मार्च : भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण क्रिकेटसोबत सामाजिक कामांसाठी ओळखला जातो. अनेकदा अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी इरफान पठाण धावून गेला आहे. सोशल मीडियावरही तो सक्रीय असतो. सध्या देशात लॉकडाउन असल्यानं सर्वच नागरिक घरांमध्ये अडकले आहेत. इरफान पठाण या काळात टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेत आहे. त्यानं एका चित्रपटातील डायलॉगवर टिकटॉक व्हिडिओ केला होता. व्हिडिओमध्ये इरफान पठाण खुर्चीवर बसलेला दिसतो. बॅकग्राउंडला अमिताभ बच्चनचा चित्रपट अग्निपथमधील डायलॉग आहे. पठाणने अमिताभ बच्चनची स्टाइल केली आहे. बच्चनप्रमाणेच इरफान पठाणनेही ती अॅक्टिंग केली आहे. पगार बढाओ, पुलिसवालोंका पगार बढाओ, इतना पैसे मे घर नही चलता तो इमान कैसे चलेगा या डॉयलॉगवर इरफान पठाणने अॅक्टिंग केली आहे.
@irfanpathan_official Huge repsepct for the ##police force. Working during ##coronavirus time Support then by abiding the rules ##quarantine ##time ♬ original sound - sumitmishra286
टिकटॉक व्हिडिओ शेअर करताना इरफान पठाणने म्हटलं की, पोलिसांचा खूप आदर आहे. कोरोना व्हायरसच्या कठीण काळात पोलीस कर्तव्य बजावत आहेत. नियम पाळत आहेत. तुम्ही त्यांना सहकार्य करा. सध्या भारताता कोरोनामुळे लॉकडाउन आहे. या परिस्थितीत पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभा राहून कोणीही बाहेर पडणार नाहीत याची खबरदारी घेत आहेत. तरीही काही ठिकाणी लोक रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यांना पोलीस कधी लाठीने तर कधी समजावून सांगून घरी जाण्याची विनंती करत आहेत.
Enjoying #JantaCurfew @iamyusufpathan pic.twitter.com/uIVcJEd3Aa
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 22, 2020
याआधीही इरफान पठाणने अनेक व्हिडिओ केले आहेत. त्यानं युसुफ पठाणसोबतही एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये युसुफ पठाण एका खुर्चीवर असून इरफान त्याच्याशी हात मिळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. यावर युसुफ त्याला अनोळखी असल्याचं म्हणतो. हे वाचा : न ऐकणाऱ्या लोकांवर पोलीस अधिकारी संतापले, ‘2 दिवस खाल्लं नाही तर मरणार नाही’