नवी दिल्ली, 05 मार्च: स्पिनचा जादूगार अर्थात लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne Death) आता आपल्यात नाही. चाहते वॉर्नच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अनेक चाहते त्याच्या क्रिकेट मॅचचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर (Shane Warne Old Videos) शेअर करत असून, या व्हिडीओंमध्ये हा महान राईट हँड बॉलर (Right Hand Bowler) त्याचं अफलातून बॉलिंग कौशल्य दाखवताना दिसत आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडबाहेर (MCG) शनिवारी सकाळपासून चाहत्यांनी वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी केली होती. ग्राउंडच्या बाहेरील वॉर्नच्या मोठ्या छायाचित्रासमोर चाहते बिअर, सिगारेट, पुष्पगुच्छ आणि फुलं अर्पण करत असल्याचं दिसत होतं. तसंच क्रिकेट क्षेत्रातल्या मंडळींनी शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली. शेन वॉर्न हा स्पिनचा जादूगार म्हणून ओळखला जात होता. त्याच्या बॉलिंगचा सामना करताना अनेक दिग्गज बॅट्समनही काहीसे घाबरून जात. आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम रचणाऱ्या या महान क्रिकेटरचं शुक्रवारी निधन झालं. वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाला तसेच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शेन वॉर्नने शुक्रवारी वयाच्या 52 व्या वर्षी थायलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे (Shane Warne Died of Heart Attack) निधन झालं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वॉर्न बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh Khan and Shane Warne Video) बॉलिंग करताना दिसत आहे, तर दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) अंपायरच्या भूमिकेत ग्राउंडच्या मध्यभागी उभे आहेत. हे वाचा- बिअर, सिगारेट आणि फुलं… क्रिकेट फॅन्सची लाडक्या वॉर्नला श्रद्धांजली विनेश प्रभू नावाच्या एका युजरनं हा व्हिडीओ अपलोड करताना लिहिलं आहे की, हा व्हिडीओ 2011 च्या आयपीएलमधला (IPL) आहे’ व्हिडीओत, नेट्समध्ये वॉर्नच्या बॉलवर शाहरुखने कव्हर ड्राईव्ह शॉट मारला असून, अंपायर गावस्कर फोर रन मिळाल्याचा इशारा करत आहेत. शाहरुख खान आयपीएल फ्रँचायझी कोलकता नाईटराईडर्सचा सहमालक आहे. केकेआरच्या मॅचच्यादरम्यान तो अनेकदा स्टेडिअमवर दिसला आहे. कॅप्टन म्हणून शेन वॉर्नने राजस्थानला आयपीएलचं पहिले विजेतेपद मिळवून दिलं होतं.
Throwback to IPL 2011
— Vinesh Prabhu (@vlp1994) March 4, 2022
When Shane Warne bowled to Shah Rukh Khan and Sunil Gavaskar was the umpire..
Good ol IPL days ❤️ pic.twitter.com/15onHXdWXH
शेन वॉर्नच्या निधनानंतर भारतापासून ते पाकिस्तानपर्यंतच्या सर्व प्लेअर्सनी ग्राउंडवर त्याला श्रद्धांजंली अर्पण केली. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी रावळपिंडी स्टेडियमवर दोन्ही टिमच्या क्रिकेटर्सनी एक मिनिट मौन पाळलं. वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व प्लेअर्स दंडाला काळी फित बांधून खेळण्यासाठी ग्राउंडवर उतरले. दुसरीकडे, मोहालीतही भारत आणि श्रीलंकेच्या क्रिकेटर्सनी पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी एक मिनिट मौन पाळत वॉर्नला श्रद्धांजली वाहिली. टेस्ट मॅचेसमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण 708 टेस्ट विकेट्स त्याच्या नावावर आहेत.