मुंबई, 16 जानेवारी : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) 2020 सालची आयपीएल (IPL 2020) युएईमध्ये खेळवण्यात आली. संकटाच्या काळातही ही स्पर्धा यशस्वी करण्यात बीसीसीआयला यश आलं, पण असं असलं तरी कोरोनाचा मोठा फटका आयपीएलला बसला आहे. आयपीएलचं बाजारमूल्य (Marker Value) तब्बल 22 टक्क्यांनी कमी झाली आहे. व्यवसायाचं आर्थिक विश्लेषण करणारी ब्रिटनची कंपनी ब्रॅण्ड फायनान्सने आयपीएलच्या 2020 सालचा आर्थिक वार्षिक अहवल प्रसिद्ध केला आहे.
आयपीएलचं 2019 सालचं बाजारमूल्य हे 47 हजार कोटी होतं, पण 2020 साली हीच किंमत 32 हजार 150 कोटी झाली आहे. आयपीएलसोबतच आयपीएलच्या टीमच्या बाजारमूल्यातही कपात झाली आहे, याला अपवाद मुंबईच्या टीमचा आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चं बाजारमूल्य 7.1 टक्क्यांनी वाढलं आहे. 500 कोटींपेक्षा जास्त मूल्य असणारी मुंबईची एकमेव टीम आहे, तर धोनीच्या चेन्नईची घसरण सगळ्यात मोठी आहे. चेन्नईच्या टीमचं मूल्य तब्बल 21 टक्क्यांनी कमी झालं आहे.
पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी मुंबई या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर यानंतर चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरू, पंजाब आणि राजस्थानचा नंबर लागतो.
टीम 2019 मूल्य 2020 मूल्य
मुंबई 480 कोटी 513. 6 कोटी
चेन्नई 550 कोटी 436.8 कोटी
कोलकाता 485.7 कोटी 426.6 कोटी
हैदराबाद 435.2 कोटी 419.2 कोटी
दिल्ली 395.9 कोटी 381.2 कोटी
बंगळुरू 383 कोटी 371 कोटी
पंजाब 304.6 कोटी 277.5 कोटी
राजस्थान 317 कोटी 265.8 कोटी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.