मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction : निवृत्तीआधी धोनीचा मास्टरस्ट्रोक, लिलावातच निवडला चेन्नईचा कॅप्टन!

IPL Auction : निवृत्तीआधी धोनीचा मास्टरस्ट्रोक, लिलावातच निवडला चेन्नईचा कॅप्टन!

IPL Auction आयपीएल 2023 साठीचा लिलाव कोच्चीमध्ये पार पडला. या लिलावात सगळ्या 10 टीम त्यांचा होमवर्क करून आल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचं प्लानिंगही लिलावात दिसून आलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kochi [Cochin], India

कोच्ची, 23 डिसेंबर : आयपीएल 2023 साठीचा लिलाव कोच्चीमध्ये पार पडला. या लिलावात सगळ्या 10 टीम त्यांचा होमवर्क करून आल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचं प्लानिंगही लिलावात दिसून आलं. एमएस धोनीची ही कदाचित शेवटची आयपीएल असेल, त्यामुळे त्याने आधीच उत्तराधिकारी निवडला आहे. मागच्या मोसमात रवींद्र जडेजाला कॅप्टन्सी देण्यात आली होती, पण जडेजा अपयशी ठरल्यानंतर अर्ध्या मोसमात त्याची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली आणि पुन्हा धोनी कर्णधार बनला.

आयपीएलच्या लिलावात सगळ्या टीम रणनीती ठरवून आल्या होत्या. सुरूवातीलाच इंग्लंडच्या खेळाडूंनी बाजी मारली. सॅम करन, बेन स्टोस्क आणि हॅरी ब्रुक यांच्यावर पैशांचा पाऊस पडला. चेन्नईची टीम त्यांनी बनवलेल्या रणनीतीमध्ये यशस्वी ठरली.

धोनीचा मास्टरस्ट्रोक

सीएसके जे निर्णय घेते त्यात कर्णधार धोनीचा हात नेहमीच असतो. टीम बनवण्यात आणि ट्रॉफी जिंकण्यात धोनीची भूमिका किती महत्त्वाची असते, हे सगळ्याच क्रिकेट रसिकांना माहिती आहे. या लिलावात धोनीची टीम भविष्यातला कर्णधार शोधण्यासाठी उतरली होती. याचाच भाग म्हणून चेन्नईने बेन स्टोक्सला 16.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. पाकिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये स्टोक्सने उत्कृष्ट कॅप्टन्सी केली.

16 कोटींपेक्षा जास्तची बोली लावून स्टोक्सला चेन्नईने विकत घेतलं. फक्त बॉलिंग आणि बॅटिंगच नाही तर कॅप्टन्सीसाठीही चेन्नईने स्टोक्सवर एवढी रक्कम खर्च केली आहे. धोनीचा हा कदाचित शेवटचा सिझन आणि जडेजा कॅप्टन्सीचा दबाव झेलू न शकल्यामुळे सीएसकेने स्टोक्सवर एवढा पैसा खर्च केला आहे.

First published:

Tags: IPL 2023, IPL auction