
आयपीएल 2022 च्या लिलावामध्ये (IPL Auction 2022) भारताचा युवा विकेट कीपर आणि आक्रमक बॅटर इशान किशन (Ishan Kishan) याच्यावर पैशांचा पाऊस पडला आहे. आयपीएलच्या या मोसमातली सर्वाधिक बोली इशान किशनवर लागली आहे. सध्या सगळीकडे इशान किशनच्या नावाची चर्चा आहे. मात्र खेळाव्यतरिक्त इशान त्याच्या पर्सनल लाईफमुळे देखील सतत चर्चेत असतो.

मुंबई इंडियन्सने इशान किशनला तब्बल 15.25 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. याचसोबत इशान किशन आयपीएल इतिहासातला चौथा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. असं जर असलं तरी सध्या सगळीकडे चर्चा त्या गर्लफ्रेंडची आहे.

इशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंदिया (Aditi Hundia) तिच्या हॉट फोटोशुटमुळे नेहमीच चर्चेत असते. ईशानप्रमाणे त्याच्या गर्लफ्रेंडचा देखील सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

इशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंदियाचे सोशल मीडियावरील फोटो पाहून लक्षात आले देखील असेल की ती एक मॉडेल आहे. ती तिचे मॉडेलिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आदितीने 2016 साली मॉडेलिंगला सुरुवात केली होती. ती एलिट मिस राजस्थान कॉन्टेस्टमध्ये रनर अप राहिली होती.

यानंतर फेमिना मिस इंडिया राजस्थान हा खिताबही तिने जिंकला होता. तसंच फेमिना मिस इंडिया 2017 मध्ये ती टॉप-15 मध्ये होती. (Aditi Hundia Instagram)

आदिती हुंदिया 2019 आयपीएल फायनलवेळी चर्चेत आली. या सामन्यात मुंबईने चेन्नईला हरवून ट्रॉफी जिंकली होती. यानंतर इशानचं नाव आदितीशी जोडलं जाऊ लागलं.

आदितीने 2018 साली मिस सुपर नॅचरल हा किताब जिंकला होता. तिने मिस युनिव्हर्स 2018 पेजेंटमध्येही तिने भाग घेतला होता. (Aditi Hundia Instagram)

इशान किशन आयपीएलमध्ये गुजरात लायन्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. मुंबईकडून खेळताना इशान सगळ्यात यशस्वी झाला होता.




