जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2021 : 9.25 कोटींची बोली लागल्यावर या खेळाडूच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

IPL Auction 2021 : 9.25 कोटींची बोली लागल्यावर या खेळाडूच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

IPL Auction 2021 : 9.25 कोटींची बोली लागल्यावर या खेळाडूच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

आयपीएलच्या यंदाच्या लिलावामध्ये (IPL Auction 2021) नेहमीप्रमाणे खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. टीम इंडियाचा नेट बॉलर कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) याला तब्बल 9.25 कोटी रुपयांना विकत घेण्यात आलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 फेब्रुवारी : आयपीएलच्या यंदाच्या लिलावामध्ये (IPL Auction 2021) नेहमीप्रमाणे खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. टीम इंडियाचा नेट बॉलर कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) याला तब्बल 9.25 कोटी रुपयांना विकत घेण्यात आलं. एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर गौतमला त्याच्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही. एवढी मोठी बोली लागल्यानंतर कृष्णप्पा गौतमचे आई-वडील आणि पत्नीला अश्रू अनावर झाले. चेन्नई सुपरकिंग्जने ऑलराऊंडर असलेल्या गौतमला एवढी मोठी रक्कम देऊन विकत घेतलं. गौतमने अजून एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेली नाही. आयपीएल लिलावात सर्वाधिक रक्कम मिळवणारा गौतम अनकॅप खेळाडू ठरला आहे. गौतमने कृणाल पांड्याचं रेकॉर्ड मोडलं. कृणाल पांड्याला मुंबई इंडियन्सने 2018 साली 8.8 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. या लिलावानंतर कृष्णप्पा गौतमने ईएसपीएन क्रिकइन्फोसोबत संवाद साधला. ‘हे तणावपूर्ण होतं. टीव्हीवर बघताना मी खूप बेचैन झालो होतो. अहमदाबादला पोहोचल्यानंतर मी टीव्ही सुरू केला, तेव्हा माझंच नाव मला समोर दिसलं. प्रत्येक मिनिटाला माझ्या भावना बदलत होत्या. तेव्हा रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याने माझं दार वाजवलं आणि मला मिठी मारली. तसंच पार्टी द्यायलाही सांगितलं,’ असं गौतम म्हणाला. कृष्णप्पा गौतमची बेस प्राईज 20 लाख रुपये होती. गौतमसाठी कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात स्पर्धा सुरू होती, पण चेन्नईने अखेर एन्ट्री घेत गौतमला टीममध्ये घेतलं. कृष्णप्पा गौतमचं आयपीएलमधलं रेकॉर्ड खास नाही. 2018 नंतरच्या तीन मोसमात त्याने 24 मॅच खेळल्या, यात त्याने 186 रन केले आणि 13 विकेट घेतल्या. 2018 आणि 2019 साली तो राजस्थानकडून खेळला, तर 2020 साली तो पंजाबच्या टीमसोबत होता. मागच्या मोसमात त्याला फक्त दोनदाच खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल लिलावावेळी गौतमचे आई-वडील आणि पत्नी बंगळुरूमध्ये होते. मला एवढे पैसे मिळाल्याचं कळल्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. ते खूप खूश झाले होते. या भावनांना शब्दांमध्ये व्यक्त करणं कठीण आहे, अशी प्रतिक्रिया गौतमने दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात