मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : लिलावाच्या दोन मिनिटानंतरच विराटचा या खेळाडूला भावुक मेसेज

IPL 2021 : लिलावाच्या दोन मिनिटानंतरच विराटचा या खेळाडूला भावुक मेसेज

आयपीएलच्या लिलावामध्ये (IPL Auction 2021) विराटच्या बंगळुरूने (RCB) मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharudeen)वर बोली लावली आणि त्याला 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.

आयपीएलच्या लिलावामध्ये (IPL Auction 2021) विराटच्या बंगळुरूने (RCB) मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharudeen)वर बोली लावली आणि त्याला 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.

आयपीएलच्या लिलावामध्ये (IPL Auction 2021) विराटच्या बंगळुरूने (RCB) मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharudeen)वर बोली लावली आणि त्याला 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.

मुंबई, 22 फेब्रुवारी : सध्याच्या पिढीतला प्रत्येक क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याला त्याचा रोल मॉडेल मानतो. भारताच्या प्रत्येक खेळाडूचं विराटसोबत क्रिकेट खेळण्याचं स्वप्न असतं, पण सगळ्यांचंच हे स्वप्न पूर्ण होत नाही. केरळचा विकेट कीपर मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharudeen) याला मात्र आता विराटसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. आयपीएलच्या लिलावामध्ये (IPL Auction 2021) विराटच्या बंगळुरूने (RCB) अजहरुद्दीनवर बोली लावली आणि त्याला 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.

मोहम्मद अजहरुद्दीन बंगळुरूच्या एका हॉटेलमध्ये बसून आयपीएलचा लिलाव बघत होता. बंगळुरूने बोली लावल्यानंतर दोन मिनिटांमध्येच अजहरुद्दीनला फोनवर एका अननोन नंबरवरून मेसेज आला, यात आरसीबीसाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन, असं लिहिलं होतं.

'लिलावाच्या दोन मिनिटानंतर मला विराट भाईचा मेसेज आला. वेलकम टू आरसीबी, ऑल द बेस्ट, विराट हेयर, असं या मेसेजमध्ये लिहिलं होतं. हा मेसेज वाचून मी खूप भावुक झालो. विराट मला मेसेज करेल, असं कधीच वाटलं नव्हतं. माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट होती. विराट माझ्यासाठी रोल मॉडेल आहे. त्याच्यासोबत क्रिकेट खेळण्याचं स्वप्न मी बघितलं होतं. त्याच्या टीममध्ये निवड झाल्यामुळे मी उत्साही आणि खूश आहे,' अशी प्रतिक्रिया अजहरुद्दीनने स्पोर्ट्सकीडाशी बोलताना दिली.

अजहरुद्दीनचं शतक

नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये अजहरुद्दीनने 37 बॉलमध्ये शतक केलं होतं. अजहरुद्दीनने 54 बॉलमध्ये नाबाद 137 रन केले होते. या खेळीमध्ये 11 सिक्स आणि 9 फोरचा समावेश होता. या स्पर्धेत अजहरुद्दीनने 5 मॅचमध्ये 194 च्या स्ट्राईक रेटने आणि 53 च्या सरासरीने 214 रन केले. 5 मॅचमध्ये अजहरुद्दीनने 15 सिक्सही लगावले.

2015 साली स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अजहरुद्दीनने 24 टी-20 मॅचमध्ये 142 च्या स्ट्राईक रेटने 451 रन केले. यात एका शतकाचा समावेश आहे.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Ipl 2021 auction, Mohammad azaarudeen, Sports, Virat kohli