मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021 : CSK ने बोली लावल्यानंतर पुजाराची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

IPL Auction 2021 : CSK ने बोली लावल्यानंतर पुजाराची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

आयपीएलमध्ये (IPL Auction 2021) चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) 7 वर्षांनंतर खेळण्याची संधी मिळाली आहे. तीन वेळची चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जने (CSK) लिलावात पुजाराला 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.

चेन्नई, 19 फेब्रुवारी : आयपीएलमध्ये (IPL Auction 2021) चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) 7 वर्षांनंतर खेळण्याची संधी मिळाली आहे. तीन वेळची चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जने (CSK) लिलावात पुजाराला 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. याआधी 2014 साली पुजारा शेवटची आयपीएल मॅच खेळला होता. टेस्ट स्पेशलिस्ट असल्यामुळे पुजाराला कोणत्याच टीमने विकत घेण्यात रस दाखवला नव्हता. पुजाराने शेवटची टी-20 मॅच 2019 साली खेळली होती.

टीमशी जोडला गेल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पुजाराचा एक व्हिडिओ शेयर केला आहे, यामध्ये पुजारा त्याच्या मुलीसोबत आहे. 'आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यामुळे खुश आहे. पिवळ्या जर्सीत खेळण्यासाठी मी तयार आहे. पुन्हा एकदा धोनी भाईसोबत खेळताना दिसेन. जेव्हा पदार्पण केलं होतं, तेव्हा धोनीच टेस्ट टीमचा कर्णधार होता. माही भाईसोबत खेळतानाच्या खूप आठवणी आहेत. आता पुन्हा एकदा त्याच्यासोबत खेळायला तयार आहे. आयपीएल आणि टेस्ट क्रिकेट पूर्णपणे वेगळं आहे. इकडे तुम्हाला वेळेनुसार खेळ बदलावा लागतो. चांगली तयारी केली, तर मी चांगली कामगिरी करेन,' असं पुजारा या व्हिडिओमध्ये म्हणाला.

पुजारा 2008 ते 2014 या कालावधीमध्ये पंजाब, बँगलोर आणि कोलकात्याकडून खेळला आहे. त्याने शेवटची टी-20 मॅच मार्च 2019 साली सौराष्ट्रकडून गोव्याविरुद्ध खेळली. आयपीएलमध्ये पुजारा 30 मॅच खेळला, यातल्या एका मॅचमध्ये त्याने अर्धशतकही केलं. 21 च्या सरासरीने आणि जवळपास 100 च्या स्ट्राईक रेटने पुजाराने 390 रन केले आहेत. स्ट्राईक रेट कमी असल्यामुळे पुजाराला आयपीएल टीमनी सोडून दिलं.

एकूण सगळ्या टी-20 क्रिकेटमध्ये पुजाराने 64 मॅचमध्ये 29 च्या सरासरीने आणि 109 च्या स्ट्राईक रेटने 1,356 रन केले. यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. 2019 साली सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत पुजाराने रेल्वेविरुद्ध शतक केलं होतं. त्याने 61 बॉलमध्ये नाबाद 100 रन केले, यामध्ये 14 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.

First published:
top videos