जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : प्रॅक्टिस सोडून हे काय करतोय युझवेंद्र चहल? राजस्थान रॉयल्सने शेअर केला Video

IPL 2023 : प्रॅक्टिस सोडून हे काय करतोय युझवेंद्र चहल? राजस्थान रॉयल्सने शेअर केला Video

प्रॅक्टिस सोडून हे काय करतोय युझवेंद्र चहल? राजस्थान रॉयलने शेअर केला Video

प्रॅक्टिस सोडून हे काय करतोय युझवेंद्र चहल? राजस्थान रॉयलने शेअर केला Video

भारतात आयपीएल या क्रिकेटच्या उत्सवाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने सरावा दरम्यानचा व्हिडिओ ट्विट केला असून यात स्टार गोलंदाज युझवेंद्र चहल इतर खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 मार्च : भारतात आयपीएल या क्रिकेटच्या उत्सवाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या 10  संघानी सरावाला सुरुवात केली असून प्रत्येक संघ यंदा विजेतेपद मिळवण्यासाठी क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. याच दरम्यान आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने सरावा दरम्यानचा एक व्हिडिओ ट्विट केलाय. यात स्टार गोलंदाज युझवेंद्र चहल इतर खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी आणि वनडे सामन्यात युझवेंद्र चहल भारतीय संघाचा भाग होता. परंतु त्याला एकाही सामन्यात भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु कसोटी आणि वनडे मालिकेत त्याने खेळाडूंसह प्रेक्षकांचे त्याच्या अतरंगी आणि खोडकर कृतींमुळे मनोरंजन केले. आता भारताचा स्टार गोलंदाज युझवेंद्र चहल आयपीएलच्या आगामी सीजन करता सराव करण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेला आहे. परंतु यावेळी देखील युझवेंद्र चहलचा खोडकर अंदाज पाहायला मिळतोय.

News18लोकमत
News18लोकमत

राजस्थान रॉयल्सने पोस्ट केलेल्या व्हिडिओत युझवेंद्र चहल जिम्बॉब्वे चा माजी क्रिकेटर ट्रेवर पेनी याच्या सोबत मस्ती करताना दिसतोय. खोडकर युझवेंद्र चहलने त्यानंतर रूममधील एक जड वस्तू उचलून ट्रेवर च्या दिशेने फेकून मारताना दिसतोय. यादरम्यान युझी मलिंगा सोबत देखील मस्ती करत असताना टायला गुदगुल्या करताना पाहायला मिळतोय.

जाहिरात

31 मार्च पासून आयपीएल 2023 ला सुरुवात होणार असून राजस्थान रॉयल्स संघाचा पहिला सामना २ एप्रिल रोजी सनरायजर्स हैद्राबाद सोबत होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात