मुंबई, 24 मार्च : आयपीएल 2023 ला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका खेळल्यानंतर आता भारताचे स्टार खेळाडू आयपीएलच्या 16 व्या सिजनसाठी सज्ज होत आहेत. अशातच भारताचा स्टार खेळाडू आणि आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आयपीएलपूर्वी नवा लूक समोर आला आहे. स्टार क्रिकेटर विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. अहमदाबाद येथील कसोटी सामन्यात त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपले 75 वे शतक ठोकले. या सामन्यात त्याने जवळपास 180 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या वनडे मालिकेत देखील त्याने अर्धशतक ठोकून संघासाठी चांगली कामगिरी केली होती. आता विराट आयपीएलच्या 16 व्या सिजनसाठी सज्ज होत आहे. तो लवकरच आरसीबी संघासोबत सरावाला सुरुवात करणार आहे.
विराटने आयपीएलपूर्वी आपला लूक बदलला आहे. सेलिब्रिटी हेयरस्टाइलिस्ट अलिम हकीम याने विराटचा हेअर कट केला असून यामुळे विराट पूर्वी पेक्षा ही देखणा दिसत आहे. विराटच्या या लूकवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
विराटचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा संघ आयपीएलमध्ये अद्याप एकदाही विजेतेपद मिळवू शकला नाही. वाईट फॉर्मातून जात असताना विराटने आरसीबी संघाचे कर्णधार पद देखील सोडले होते. मात्र यंदा विराट फॉर्मात असल्याने त्याचे चाहते देखील खुश असून यावर्षी आरसीबीचा संघ आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.