मुंबई : IPL मध्ये सामने अटीतटीचे आणि चुरशीचे सुरू आहेत. मैदानावर छोटे वाद होत असतात मात्र इथे तर RCB विरुद्ध लखनऊ झालेल्या सामन्यात मैदानात राडाच झाला. लखनऊ विरुद्ध बंगळुरू झालेल्या सामन्यात मैदानात तुफान राडा झाल्याचं समोर आलं. त्यानंतर IPL च्या व्यवस्थापकांनी दोघांनाही दंड ठोठावला आहे. या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करत बंगळुरूने 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 126 धावा केल्या. लखनऊच्या टीमला लक्ष्य गाठता आले नाही. त्यानंतर लखनऊचा कोच गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला. मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम एकमेकांचा निरोप घेत होते. कोहली लखनऊच्या इतर खेळाडूंना भेटत होता. कोहली आणि गंभीरने हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला तेव्हा गंभीर रागात दिसला.
कोहलीने नवीन-उल-हकशी हस्तांदोलन केले आणि काहीतरी म्हणत पुढे गेला. नवीनने परत उत्तर दिलं. कोहलीनेही उत्तर दिलं आणि नवीन कोहलीच्या दिशेने वळला. दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलने नवीनला वाद टाळण्यासाठी मागे घेतलं आणि हा वाद टाळण्याचा प्रयत्न केला.
IPL 2023 RCB vs LSG : विराट कोहली - गौतम गंभीरमध्ये पुन्हा राडा, पाहा मॅचनंतर मैदानावर नेमके काय घडलं?मेयर्स पुन्हा कोहलीजवळ आला आणि काहीतरी बोलू लागला, पण त्यानंतर गंभीरने येऊन मेयर्सला ओढून नेले. त्यानंतर कोहली पुढे गेला आणि डुप्लेसीशी बोलू लागला. तो गंभीरशी लांबून बोलत होता, त्याच्या बोलण्याला गंभीरही उत्तर देत असताना तो खूप संतापलेला दिसत होता. केएल राहुलने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
वानखेडे स्टेडियम बाहेरच विकली पाणीपुरी, आतून पाहण्याचं होतं स्वप्न, तिथेच झळकावलं शतकया सगळ्या प्रकरणानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरवर कारवाई करण्यात आली असून त्यांना 100 मॅच फीमधील दंड भरावा लागणार आहे. तर नवीन उल हक याला सुद्धा मॅच फीमधील 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.