जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 RCB vs GT : विराट कोहलीने लावली शतकांची माळ; मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

IPL 2023 RCB vs GT : विराट कोहलीने लावली शतकांची माळ; मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

विराट कोहलीने लावली शतकांची माळ, मोडला ख्रिस गेलचा हा रेकॉर्ड

विराट कोहलीने लावली शतकांची माळ, मोडला ख्रिस गेलचा हा रेकॉर्ड

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकलं आहे. हे यंदाच्या आयपीएलमधील त्याचे दुसरे शतक आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

;बंगळुरू, 21 मे : आयपीएल 2023 मधील शेवटचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. यासामन्यात विराट कोहलीने  शतक ठोकलं आहे. विराट कोहलीचे यंदाच्या आयपीएलमधील ही दुसरे शतक असून काही दिवसांपूर्वी त्याने हैदराबाद विरुद्ध खेळताना या सिजनमधील पहिले शतक ठोकले होते. बंगळुरू येथील चिन्नसस्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीकडून सलामी फलंदाज म्हणून विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसची जोडी मैदानात उतरली.  परंतु 67 धावांची पार्टनरशीप केल्यानंतर फाफ डू प्लेसिसची विकेट पडली. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल देखील अधिककाळ मैदानात टिकू शकला नाही आणि 9 व्या ओव्हरला त्याची देखील विकेट पडली. परंतू अशावेळी स्टार फलंदाज विराट कोहलीने आरसीबीला सावरले. विराटने मैदानावर फटकेबाजी सुरूच ठेवली.

News18लोकमत
News18लोकमत

अखेर विराट कोहली 61 चेंडूंवर 101 धावा करून नाबाद राहिला. विराट चे हे शतक यंदाच्या आयपीएलमधील त्याचे दुसरे शतक ठरले. विराटने आयपीएल 2023 मधील सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या 67 व्या सामन्यात देखील शतक ठोकले होते. विराटची आयपीएल कारकिर्दीतील हे 7 वे शतक आहे. 70 व्या सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्स समोर 20 ओव्हरमध्ये 198 धावा करण्याचे आव्हान ठेवले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात