मुंबई, 4 मे : आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जाएंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्यात मैदानावर झालेला वाद शांत झाला असला तरी सोशल मीडियावर अजूनही यांच्यातील वादाचीच चर्चा सुरु आहे. काल चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यातील सामन्यात गौतम गंभीरला पाहताच विराट कोहलीच्या चाहत्यांनी घोषणा दयायला सुरुवात केली. ज्यावर गंभीरने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल 2023 मध्ये 45 वा सामना उत्तर प्रदेशातील एकना स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. सुरुवातीला टॉस जिंकून चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या लाखनऊच्या संघाला चेन्नईच्या गोलंदाजांनी नाकीनऊ आणले. चेन्नईने 19.2 ओव्हरमध्ये पंजाबच्या 7 विकेट्स घेतल्या तेव्हा पंजाबची धावसंख्या 125 इतकी झाली होती, परंतु अचानक पाऊस सुरु झाल्याने सामन्यातील एकही डाव पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे सामना अनिर्णित ठरून दोन्ही संघांना एक एक पॉईंट्स देण्यात आले.
This is brutal ragging from the crowd. 😂 #LSGvsCSK #ViratKohli #GautamGambhir pic.twitter.com/q13QRBdKDS
— VANGA stan ✍️☘️ (@EddyTweetzBro) May 4, 2023
पाऊस पडू लागल्याने दोन्ही संघातील खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जात असताना गौतम गंभीरला पाहून विराटच्या चाहत्यांनी विराट कोहली च्या नावाचे नारे दिले. यामुळे गौतम गंभीर चिडलेला दिसला. काही वेळ त्याने विराटच्या चाहत्यांकडे नजर रोखून पाहिले आणि नंतर तो पुन्हा पुढे चालायला लागला. सध्या गौतम गंभीरचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. विराट गंभीरमधील वादाचे प्रकरण : 1 मे रोजी आरसीबी विरुद्ध लखनऊ सामन्यात आरसीबीने लखनऊचा 18 धावांनी पराभव केला. लखनऊचा खेळाडू कायले मायर्स विराटसोबत मॅचनंतर गप्पा मारत असताना गौतम गंभीर तेथे येऊन अचानकपणे आपल्या खेळाडूला घेऊन गेला. दरम्यान मॅचनंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसोबत हात मिळवत असताना लखनऊचा गोलंदाज नवीन उल हकने विराटसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला अन् काही अपशब्द वापरले. विराटने त्याच्याकडे दुर्लक्ष केले परंतु नवीन विराटच्या अंगावर धावून गेला.
विराट आणि नवीन मधील हा वाद पाहताच गौतम गंभीर आक्रमक होऊन विराटच्या दिशेने धावला. आपल्या संघातील खेळाडूची बाजी घेऊन गंभीर विराट सोबत भांडू लागला. काहीकाळ विराट गंभीरमध्ये वाद झाला अखेर इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. परंतु कोहली आणि गंभीरमधील वादाचा व्हिडिओची सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गौतम गंभीर आणि विराट कोहलीला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.