स्टम्पिंगमुंबई, 14 मे : आयपीएल 2023 मध्ये 60 वा सामना आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात आरसीबीने राजस्थानच्या होमग्राउंडवरच त्यांचा 112 धावांनी लाजिरवाणा पराभव केला. आरसीबीने भेदक गोलंदाजी आणि जबरदस्त फिल्डिंगच्या जोरावर राजस्थान रॉयल्सला ऑल आउट केले. या दरम्यान आर अश्विनला रन आउट करताना आरसीबीच्या विकेटकिपरने धोनी स्टाईल विकेटकिपिंग करून त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जयपूर येथील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सामना खेळवण्यात आला. यावेळी आरसीबीच्या कर्णधाराने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. आरसीबीने फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकीय खेळाच्या जोरावर 171 धावा केल्या. तर राजस्थान रॉयल्सला आरसीबीने 20 ओव्हरमध्ये विजयासाठी 172 धावा करण्याचे आव्हान दिले.
𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦!
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2023
The Anuj Rawat direct-hit that left everyone in disbelief 🔥🔥
Check out the dismissal here 🔽 #TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/2GWC5P0nYP
राजस्थान रॉयल्सकडून विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी स्टार फलंदाज मैदानात उतरले. परंतु त्यांना 60 धावा करणे ही शक्य झाले नाही आणि केवळ 59 धावांवर संपूर्ण संघ ऑल आऊट झाला. 28 धावांवर राजस्थानच्या 5 विकेट गेल्या असताना आर अश्विन मैदानात आला. त्याने हेटमायर सोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु आरसीबीचा विकेट किपर अनुज रावतने एम एस धोनी स्टाईल विकेट किपींग करत त्याला रन आउट केले. सध्या अनुज रावतने केलेल्या या रन आउटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.