मुंबई, 27 एप्रिल : आयपीएल ही जगप्रसिद्ध टी 20 क्रिकेट स्पर्धेचा 16 वा सीजन आता रंगात येऊ लागलाय. आयपीएल सामने पाहायला स्टेडियमवर येणारे प्रेक्षक कॅमेऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक भन्नाट गोष्टी करीत असतात. अशातच सध्या आरसीबीच्या एका चिमुकल्या चाहतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिने आरसीबीसाठी लिहिलेला संदेश पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाने आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यातील 4 सामने जिंकले आहेत. आरसीबीचा संघ आयपीएलच्या इतिहासात अनेकदा फायनल पर्यंत पोहोचला परंतु तो एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावू शकला नाही. तेव्हा यंदातरी आरसीबीने आयपीएलची ट्रॉफी जिंकावी यासाठी एका चिमुकल्या चाहतीने एक हट्ट धरला आहे.
Beti bachao beti padhao crying in the corner pic.twitter.com/scQbdoPjpR
— Shikhar Sagar (@crazy__shikhu) April 26, 2023
सध्या आरसीबीची जर्सी घालून हातात पोस्टर पकडलेल्या एका लहान मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत एक लहान चिमुकलीच्या हातातील पोस्टरवर “जो पर्यंत आरसीबी आयपीएलचे विजेतेपद जिंकत नाही तोवर मी शाळेत जाणार नाही”. व्हायरल होणाऱ्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे हातात पोस्टर घेतलेल्या एका लहान मुलाचा देखील फोटो व्हायरल झाला होता. यामाध्यमातून लहान मुलाने विराट कोहलीची मुलगी वामिकाला डेटवर घेऊन जाण्याची मागणी विराटकडे केली होती.