जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 DC vs GT : रिषभ पंत रिटर्न्स! दिल्लीची मॅच पाहण्यासाठी पंत स्टेडियममध्ये

IPL 2023 DC vs GT : रिषभ पंत रिटर्न्स! दिल्लीची मॅच पाहण्यासाठी पंत स्टेडियममध्ये

होम ग्राउंडवर दिल्ली कॅपिटल्सची मॅच पाहण्यासाठी आला रिषभ पंत

होम ग्राउंडवर दिल्ली कॅपिटल्सची मॅच पाहण्यासाठी आला रिषभ पंत

आज आयपीएल 2023 ची सातवी मॅच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात असून हा सामना पाहण्यासाठी सध्या दुखापतग्रस्त असलेला रिषभ पंत स्टेडियमवर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली असल्याने सध्या क्रिकेट विश्वात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच आज आयपीएल 2023 ची सातवी मॅच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात असून हा सामना पाहण्यासाठी एक खास पाहुणा स्टेडियमवर आला आहे. आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सुरु असून तब्बल 2 वर्षांनी दिल्ली आपल्या होम ग्राउंडवर हा सामना खेळत आहे. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांना स्टेडियमवर मोठं सरप्राईज मिळालं आहे.  दिल्लीचा त्यांच्या होम ग्राउंडवरील पहिला सामना पाहण्यासाठी सध्या दुखापतग्रस्त असलेला संघाचा  माजी कर्णधार रिषभ पंत मैदानात आला आहे. रिषभ पंतच्या येण्याने त्याचे फॅन्स भलतेच उत्साहित झाले आहेत. मोठ्या कालावधीनंतर पहिल्यांदाच रिषभ पंत स्टेडियमवर परतल्याने त्याला पाहाताच चाहत्यांनी त्याच्या नावाच्या घोषणां देऊन  अख्ख स्टेडियम गाजवलं.

News18लोकमत
News18लोकमत

भारताचा युवा स्टार क्रिकेटर रिषभ पंतच्या कारला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याच्या पायावर 2 शस्त्रक्रिया देखील पारपडलया.  यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात रिषभच्या अनुपस्थितीत त्याची  आठवण म्हणून त्याची जर्सी डगआउटमध्ये लावून ठेवली होती. दिल्ली संघाच्या या कृतीने तेव्हा सर्वांचे मन जिंकले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात