जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 RCB vs RR : होम ग्राउंडवर आरसीबीचा विजय! राजस्थान रॉयल्सला चारली पराभवाची धूळ

IPL 2023 RCB vs RR : होम ग्राउंडवर आरसीबीचा विजय! राजस्थान रॉयल्सला चारली पराभवाची धूळ

होम ग्राउंडवर आरसीबीचा विजय! राजस्थान रॉयल्सला चारली पराभवाची धूळ

होम ग्राउंडवर आरसीबीचा विजय! राजस्थान रॉयल्सला चारली पराभवाची धूळ

आयपीएल 2023 मधील 32 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने राजस्थान संघाचा दारुण पराभव केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 एप्रिल : आयपीएल 2023 मधील 32 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने राजस्थान संघाचा दारुण पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी विजय झाला असून आरसीबीला राजस्थानचा विजयी रथ रोखणे शक्य झाले. बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात हा सामना पारपडला असून सुरुवातीला आरसीबीचा संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. यावेळी आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेल 77, फाफ डू प्लेसिसने 62 तर दिनेश कार्तिकने 16 धावा केल्या. तर विराट कोहली सह आरसीबी कोणत्याही फलकंदाजला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही. तर राजस्थान रॉयल्स गोलंदाजांपैकी संदीप शर्मा आणि बोल्टने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर आर अश्विन आणि चहल या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स घेऊन 189 धावा केल्या.

News18लोकमत
News18लोकमत

विजयासाठी राजस्थान रॉयल्सला  190 धावांच आव्हान असताना राजस्थानकडून यशस्वी जैसवालने 47, देवदत्त पद्दीकलने 52, संजू सॅमसनने 22, ध्रुव जुरेलने 31 तर आर अश्विनने 12 धावा केलया. परंतु अखेर  राजस्थान रॉयल्स त्यांना दिलेले विजयाचे आव्हान पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यांचा 7 धावांनी पराभव झाला. आरसीबीने आयपीएल 2023 मधील त्यांचा चौथा विजय मिळवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात