जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 RCB vs GT : कॅच पकडण्याच्या नादात तिघे एकमेकांवर आदळले, पुढे जे घडलं ते पाहून सर्वच हैराण Video

IPL 2023 RCB vs GT : कॅच पकडण्याच्या नादात तिघे एकमेकांवर आदळले, पुढे जे घडलं ते पाहून सर्वच हैराण Video

कॅच पकडण्याच्या नादात तिघे एकमेकांवर आदळले, पुढे जे घडलं ते पाहून सर्वच हैराण Video

कॅच पकडण्याच्या नादात तिघे एकमेकांवर आदळले, पुढे जे घडलं ते पाहून सर्वच हैराण Video

आयपीएल 2023 मधील 23 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स गोलंदाजी करताना मैदानावर विचित्र प्रकार घडला जो पाहून प्रेक्षक हैराण झाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 एप्रिल : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2023 मधील 23 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम गोलंदाजी करताना पहिल्याच ओव्हरमध्ये गुजरातच्या वृद्धिमान साहाची विकेट घेतली. परंतु ही विकेट घेताना मैदानावर विचित्र प्रकार घडला जो पाहून प्रेक्षक हैराण झाले. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गुजरतकडून प्रथम फलंदाजीसाठी शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा हे दोघे मैदानात उतरले. वृद्धिमान साहाने पहिल्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर जबरदस्त चौकार मारला. परंतु त्यांनंतरच्या पुढच्याच बॉलला गोलंदाज बोल्टने साहाची विकेट घेतली.

News18लोकमत
News18लोकमत

परंतु साहाची विकेट घेत असताना मैदानावर विचित्र प्रकार घडला. गोलंदाज बोल्टने पहिल्या ओव्हरमधील तिसरा बॉल टाकताच साहाने त्याच्यावर जोरदार शॉट मारला. परंतु हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर न जात मैदानाच्या आताच उंचावर गेला. साहाचा हा झेल पकडण्यासाठी मैदानात उभे असलेला संजू सॅमसन , शिमरोन हेटमायर आणि ध्रुव जुराल हे तिघे ही धावले. संजू हा माझा झेल आहे असे ओरडत होता, परंतु त्याचे कुणीच ऐकले नाही. आणि हा चेंडू  संजू पकडणार तितक्यातच हेटमायर आणि ध्रुव हे दोघे त्याला धडकले. संजूच्या हातून चेंडू निसटला पण बोल्टने तो पकडला आणि अशा प्रकारे साहा कॅच आउट झाला.

जाहिरात

सामन्यात घेतलेला असा विचित्र कॅच पाहून सर्वचजण हैराण झाले. सध्या या भन्नाट कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात