जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : क्लासेनच्या शतकावर विराटचं शतक भारी, RCBच्या विजयाने वाढलं मुंबईचं टेन्शन

IPL 2023 : क्लासेनच्या शतकावर विराटचं शतक भारी, RCBच्या विजयाने वाढलं मुंबईचं टेन्शन

Photo- IPL/Twitter

Photo- IPL/Twitter

विराट कोहलीचं झुंजार शतक आणि फाफ डुप्लेसिसच्या अर्धशतकामुळे आरसीबीने हैदराबादचा पराभव केला आहे.

  • -MIN READ Hyderabad,Telangana
  • Last Updated :

हैदराबाद, 18 मे : विराट कोहलीचं झुंजार शतक आणि फाफ डुप्लेसिसच्या अर्धशतकामुळे आरसीबीने हैदराबादचा पराभव केला आहे. हैदराबादने दिलेलं 187 रनचं आवाहन आरसीबीने 2 विकेट गमावून 19.2 ओव्हरमध्ये पार केलं. विराट कोहलीने 63 बॉलमध्ये 100 रनची खेळी केली, यामध्ये 12 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर फाफने 47 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 71 रन केले. मॅक्सवेल 5 आणि ब्रेसवेल 4 रनवर नाबाद राहिले. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि नटराजनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 186/5 पर्यंत मजल मारली. हेनरिक क्लासेनने 51 बॉलमध्ये 104 रन केले. क्लासेनच्या इनिंगमध्ये 8 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. तर हॅरी ब्रुकने नाबाद 27 रन केले. आरसीबीच्या या विजयामुळे मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबीची टीम चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आता प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला हैदराबादविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल, याचसोबत आरसीबीचा गुजरातविरुद्ध पराभव होणं गरजेचं आहे. चेन्नई आणि लखनऊने त्यांचे उरलेले दोन सामने गमावले आणि मुंबई-आरसीबीने शेवटचे दोन्ही सामने जिंकले तर आरसीबी आणि मुंबई या दोन्ही टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात