जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 PBKS vs RR : पंजाब किंग्सने गाजवलं मैदान! रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव

IPL 2023 PBKS vs RR : पंजाब किंग्सने गाजवलं मैदान! रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव

 पंजाब किंग्सने गाजवलं मैदान! राजस्थान रॉयल्सचा दारुण पराभव

पंजाब किंग्सने गाजवलं मैदान! राजस्थान रॉयल्सचा दारुण पराभव

आज आयपीएल 2023 चा आठवा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला, या सामन्यात पंजाबने राजस्थानचा पराभव केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 मार्च :  आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात झाली असून यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज आयपीएल 2023 चा आठवा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला या सामन्यात पंजाबने राजस्थानचा पराभव केला आहे. पंजाब किंग्सने 5 धावांनी सामना जिंकला असून यासह आयपीएल 2023 च्या सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडीयमवर पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पारपडला.  यात पंजाब किंग्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला.  या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन जबरदस्त बॅटिंग केली. शिखर धवनने 56 चेंडूंमध्ये संघासाठी 83 धावांची नाबाद खेळी. तर प्रभसिमरन सिंहने 34 चेंडूत 60 धावा करून संघाला मोठी लीड मिळवून दिली. पंजाब किंग्सने राजस्थान विरुद्ध बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स देऊन  197 धावा केल्या. तर राजस्थानकडून जेसन होल्डरने 1 विकेट तर आर अश्विन आणि युजवेंद्र चहलने   प्रत्येकी 1 विकेट घेतली.

News18लोकमत
News18लोकमत

पंजाबने विजयासाठी राजस्थान समोर 198 धावांचे आव्हान दिले असताना, राजस्थानकडून अनपेक्षितपणे स्टार गोलंदाज आर अश्विन मैदानात उतरला. त्याला पाहून काहीकाळ चाहते अवाक झाले. परंतु तो संघासाठी शुन्य धावांचे योगदान देऊ शकला. सुरुवातीलाच सलग दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्सच्या  तीन विकेट्स गेल्या. त्यानंतर संजू सॅमसनने संघासाठी 42 धावांची झुंजार खेळी केली परंतु तो देखील 11 व्या ओव्हरमध्ये बाद झाला.  शेवटच्या काही ओव्हरमध्ये हेटमायर आणि जुरेलने राजस्थानसाठी झुंजार खेळी केली. हेटमायरने 36 तर  जुरेलने 32 धावा केल्या. परंतु अखेर या रोमांचक सामन्यात पंजाबचा विजय झाला. राजस्थान रॉयल्सला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स घालून केवळ 192 धावाच करता आल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात