मुंबई, 23 मार्च : भारतात आयपीएल या क्रिकेटच्या उत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. 31 मार्च पासून आयपीएलच्या 16 व्या सिझनला सुरुवात होणार असून यंदाच्या वर्षी आयपीएलच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.
आयपीएल 2023 मध्ये काही नव्या नियमांना स्थान देण्यात आले आहे. यातील प्रमुख नियम म्हणजे आता टॉस झाल्यानंतर संघांचे कर्णधार आपल्या संघाची प्लेईंग 11 जाहीर करू शकणार आहेत. टॉस हरल्यानंतर मिळालेल्या कौलाचा फटका संघांना बसू नये तसेच दोन्ही संघांना समसमान संधी देण्यात यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट लीगमध्ये हा नियम लागू करण्यात आला होता.
यापूर्वीच्या आयपीएल सिझनमध्ये टॉस होण्याआधीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपल्या संघातील प्लेईंग 11 खेळाडूंची यादी जाहीर करावी लागत होती. त्यामुळे अनेकदा टॉस हरल्यावर संघाच्या परफॉर्मन्सवर याचा परिणाम होत होता. परंतु आता टॉस जिंकल्यानंतर प्लेईंग 11 जाहीर करता येणार असल्याने ही बाबा टॉस हरणाऱ्या संघासाठी फायदेशीर ठरू शकते. अर्थात, या नव्या नियमाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, IPL 2023