जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / '... मग पाहाते तुला कोण वाचवतं', मोहम्मद शमीच्या पत्नीने सोशल मीडिया पोस्ट करत दिली धमकी

'... मग पाहाते तुला कोण वाचवतं', मोहम्मद शमीच्या पत्नीने सोशल मीडिया पोस्ट करत दिली धमकी

'... मग पाहाते तुला कोण वाचवतं', मोहम्मद शमीच्या पत्नीने सोशल मीडिया पोस्ट करत दिली धमकी

'... मग पाहाते तुला कोण वाचवतं', मोहम्मद शमीच्या पत्नीने सोशल मीडिया पोस्ट करत दिली धमकी

मोहम्मद शमीने त्याची पत्नी अभिनेत्री हसीन जहाँ हिच्याशी घटस्फोट घेतला असून पोटगीच्या रकमेवरुन दोघांमधील वाद सध्या कोर्टात पोहोचला आहे. अशातच शमीच्या पत्नीने इंस्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21  एप्रिल : भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी मागील काही काळापासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत येत असतो. मोहम्मद शमीने त्याची पत्नी अभिनेत्री हसीन जहां हिच्याशी घटस्फोट घेतला असून पोटगीच्या रकमेवरुन दोघांमधील वाद सध्या कोर्टात पोहोचला आहे. क्रिकेटच्या मैदानावरील शमीची कामगिरी सुधारत असताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद संपण्याच नाव घेत नाही. अशातच मोहम्मद शमीच्या पत्नीने इंस्टाग्रामवर 400 शब्दांची पोस्ट लिहिली असून तिच्या या पोस्टने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहां हिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, " अतिक अहमद यांचेही अनेक चाहते आणि समर्थक होते. पैसा आणि सत्ताही होती. पण काही उपयोग झाला का? त्याला अखेर ठार मारण्यात आले. फॅन्स आणि त्याच्या समर्थकांनी काय केले? म्हणूनच ….लोभी गुन्हेगाराने हेही लक्षात ठेवले पाहिजे की पैसा देऊन वृत्तवाहिन्या विकत घेऊन स्वतःचा गुन्हा लपवता येतो पण देवापासून कसा लपवणार? अल्लाहपासून तुझे कृत्य कसे लपवणार…?"

News18लोकमत
News18लोकमत

हसीन जहांने मोहम्मद शमीवर वकील खरेदी केल्याचा आरोपही केला. तिने लिहिले, “माझे वकील किती काळ विकत घेघेशील? न्यायाधीशांना किती काळ मॅनेज करशील?   तुमचाही वाईट काळ येईल. इंशा अल्लाह. मग बघेन तुला कोण वाचवतो? इतिहास साक्षी आहे. गुन्हेगारांना लगेच शिक्षा होत नाही,… एक म्हण आहे देवाच्या घरात देर हे पर अंधेर नाही आणि जेव्हा शिक्षा दिली जाते तेव्हा त्याचे निवासस्थान कबर किंवा नरक असते”. हसीन जहांने तिच्या पोस्टमध्ये खूप काही लिहिले मात्र तिने यात मोहम्मद शमीच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नाही. परंतु असे असले तरी देखील ही पोस्ट तिने तिचा पूर्व पती आणि स्टार गोलंदाज मोहम्मद शमीलाच उद्देशून लिहिल्याचे म्हंटले जात आहे.

जाहिरात

काय आहे प्रकरण? मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांनी ६ जून २०१४ रोजी लग्न केले होते तसेच त्यांना एक मुलगी देखील आहे. परंतु वैवाहिक आयुष्यात अनेक वाद झाल्याने दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला यावेळी हसीन जहां हिने शमीवर अनेक आरोप लावले. हसीनने 2018 मध्ये तिला शमीकडून महिन्याला 10 लाख रुपये पोटगी मिळावी, अशी मागणी करणारी कायदेशीर याचिका दाखल केली होती. या याचिकेत तिनं म्हटलं होतं की, मला वैयक्तिक खर्चासाठी 7 लाख रुपये आणि मुलीच्या संगोपनासाठी दरमहा 3 लाख रुपये पोटगी हवी आहे. परंतु कोलकाता न्यायालयानं शमीला त्याची पत्नी हसीन जहांला मासिक 50 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. अलीपूर न्यायालयाच्या न्यायाधीश अनिंदिता गांगुली यांनी हा निर्णय दिला होता. या निर्णया विरुद्ध हसीन जहां हिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात