जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 MI vs KKR : इशान किशन आऊट होताच, सुहाना हे काय बोलून गेली? आता सोशल मीडियावर होतेय चर्चा

IPL 2023 MI vs KKR : इशान किशन आऊट होताच, सुहाना हे काय बोलून गेली? आता सोशल मीडियावर होतेय चर्चा

 इशान किशन आऊट होताच, सुहाना हे काय बोलून गेली? आता सोशल मीडियावर होतेय चर्चा

इशान किशन आऊट होताच, सुहाना हे काय बोलून गेली? आता सोशल मीडियावर होतेय चर्चा

मुंबई इंडियन्सने केकेआरचा 5 विकेट्सने पराभव करून आयपीएल 2023 मधील सलग दुसरा सामना जिंकला. यावेळी स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेली शाहरुख खानची मुलगी सुहाना हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरचा 5 विकेट्सने पराभव करून आयपीएल 2023 मधील सलग दुसरा सामना जिंकला. यावेळी स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेली केकेआरची मालकीण म्हणजेच शाहरुख खानची मुलगी सुहाना हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतीळ वानखेडे स्टेडियमवर  मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात 16 एप्रिल रोजी सामना रंगला होता. या सामन्यात टॉस जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे सुरुवातीला फलंदाजीसाठी उतरलेल्या केकेआर संघाने 20 ओव्हरमध्ये 185 धावा केल्या. कोलकाताने विजयासाठी मुंबईला 186 धावांचे आव्हान दिले असताना मुंबईकडून ईशान किशनने दमदार अर्धशतक ठोकून चांगली सुरुवात करून दिली.

News18लोकमत
News18लोकमत

मुंबई विरुद्ध केकेआर यांच्यातील सामना पाहण्यासाठी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या मित्रमंडळींसोबत स्टेडियमवर आली होती. ईशान किशनच्या दमदार खेळीनंतर आठव्या ओव्हरमध्ये त्याची विकेट गेली. ही विकेट पडताच सुहानाच्या तोंडून ‘F*** off’ असे शब्द बाहेर पडले.

Did Suhana just say F##k Off to Ishan Kishan in todays match by u/quizzardofozz in BollyBlindsNGossip

जाहिरात

सुहानाची ही रिअक्शन कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात