जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 MI vs CSK : वानखेडेवरील हायव्होल्टेज सामन्यापूर्वी CSK ला धक्का! महत्वाच्या खेळाडूला दुखापत

IPL 2023 MI vs CSK : वानखेडेवरील हायव्होल्टेज सामन्यापूर्वी CSK ला धक्का! महत्वाच्या खेळाडूला दुखापत

वानखेडेवरील हायव्होल्टेज सामन्यापूर्वी CSK ला धक्का! धडाकेबाज खेळाडूला दुखापत

वानखेडेवरील हायव्होल्टेज सामन्यापूर्वी CSK ला धक्का! धडाकेबाज खेळाडूला दुखापत

मुंबईचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आज सामना रंगणार आहे. अशातच चेन्नई संघाच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आज हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. मुंबईचे होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार असून याकरता मुंबई इंडियन्स सह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचे फॅन्स देखील उत्साहित आहेत. अशातच चेन्नई संघाच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. चेन्नई सुपरकिंग्स आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये 2 सामने खेळली असून यातील चेपॉक स्टेडियमवर खेळण्यात आलेला सामना त्यांनी जिंकला आहे. आज मुंबई विरुद्ध यंदाच्या आयपीएलमधील तिसरा सामना खेळण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरणार असून यापूर्वी चेन्नईला एक मोठा धक्का बसला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार चेन्नई संघातील बेन स्टोक्सला दुखापत झाली असून तो मुंबई विरुद्धच्या सामन्यांसाठी पूर्णपणे फिट नाही. शुक्रवारी सराव करत असताना बेन स्टोक्सला पायाच्या टाचेत वेदना होत होती. यानंतर डॉक्टरांनी त्याला पुढील 10 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळत आहे.  आयपीएल 2023 मध्ये चेन्नई संघाच्या दोन सामन्यांमध्ये बेन स्टोक्सची कामगिरी काही खास राहिली नव्हती. त्याने आतपर्यंत 15 धावा केल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

बेन स्टोक्सच्या दुखापतीबद्दल चेन्नई सुपरकिंग्सने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु जर बेन स्टोक्स दुखापत ग्रस्त असेल तर चेन्नई त्याला खेळवण्याची रिस्क घेणार नाही. तसेच बेन स्टोक्स हा इंग्लंडच्या कसोटी संघाचा देखील कर्णधार असल्याने भविष्यातील सामने लक्षात घेऊन त्याच्या दुखापतीवर इंग्लंड बोर्डाचे देखील लक्ष असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात