जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 LSG vs SRH : विराट कोहलीच्या चाहत्यांनी घेतला लखनऊशी पंगा, स्टेडियममध्ये असं काही केलं की...

IPL 2023 LSG vs SRH : विराट कोहलीच्या चाहत्यांनी घेतला लखनऊशी पंगा, स्टेडियममध्ये असं काही केलं की...

विराट कोहलीच्या चाहत्यांनी घेतला लखनऊशी पंगा, स्टेडियममध्ये असं काही केलं की...

विराट कोहलीच्या चाहत्यांनी घेतला लखनऊशी पंगा, स्टेडियममध्ये असं काही केलं की...

लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या मॅचमध्ये आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीच्या चाहत्यांनी लखनऊच्या डग आउटमध्ये गोंधळ घातला, त्यामुळे काहीकाळ चालू मॅच थांबवण्याची वेळ आली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 मे : आयपीएल 2023 मध्ये 58 वी मॅच लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पारपडली. या मॅचमध्ये आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीच्या चाहत्यांनी मॅच दरम्यान डग आउटमध्ये गोंधळ घातला, त्यामुळे काहीकाळ चालू मॅच थांबवण्याची वेळ आली. सनरायजर्स हैदराबादचे होम ग्राउंड असलेल्या राजीव गांधी स्टेडियमवर लखनऊ विरुद्ध हैदराबाद यांच्यात मॅच खेळवण्यात आली. या मॅचमध्ये पहिल्या डावात हैदराबादचा संघ फलंदाजी करत होता. यावेळी 19 व्या ओव्हरमधील लखनऊच्या गोलंदाजाने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर मैदानावरील अंपायरने नो बॉल दिला. परंतु लखनऊच्या टीमने या निर्णया विरुद्ध डीआरएसची मागणी केली, तेव्हा तिसऱ्या अंपायरने नो बॉलचा निर्णय मागे घेतला. परंतु यानंतर हैदराबादचा हेन्रीचं क्लासेन  मैदानावरील अंपायरशी वाद घालताना दिसला. तिसऱ्या अंपायरने हैदराबादला नो बॉल न दिल्यामुळे स्टेडियमवर उपस्थित हैदराबादच्या प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली.  नो बॉलच्या या निर्णयांनंतर लखनऊच्या डग आउटमध्ये एकच गोंधळ उडाला.  स्टेडियमवर ‘कोहली कोहली’ नावाच्या घोषणा देणाऱ्या काही प्रेक्षकांनी लखनऊ डगआऊटच्या दिशेने काहीतरी फेकले, ज्यामुळे वाद आणखी वाढून सामना जवळपास 10 मिनिटे थांबण्यात आला होता.

जाहिरात

घटना घडताच लखनऊचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि बाकीचे कोचिंग स्टाफ मैदानावर आले. दरम्यान, मैदानात फिल्डनिंग करत असलेले लखनऊचे खेळाडूही एकत्र आले. यावेळी पोलिसही प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये दिसले. सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चनुसार प्रेक्षक स्टॅन्डमधून लखनऊच्या डगआऊटच्या दिशेने काही तरी फेकल्याचे बोलले जात आहे.  यानंतर काही वेळाने अंपायर्सनी सामना पुन्हा सुरू केला. विराट गंभीर वाद : आयपीएलमधील 43 वा सामना आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पारपडला होता. या सामन्या दरम्यान आरसीबीचा फलंदाज विराट कोहली आणि लखनऊचा नवीन उल हक यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान वाद झाला. या वादात लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर याने उडी घेत विराट कोहलीशी भांडण केले. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन विराट कोहलीचे चाहते गौतम गंभीरला ट्रोल करत आहेत. शनिवारी लखनऊ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्या दरम्यान लखनऊच्या डगआउटमध्ये झालेल्या हल्या दरम्यान गौतम गंभीर डगआउटमध्ये उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. तसेच गौतम गंभीरला पाहूनच विराट कोहलीच्या चाहत्यांनी हा प्रकार केल्याच्या चर्चा आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात