मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2023 : प्रीती पुन्हा करणार मोठी शॉपिंग, पंजाबने कॅप्टनसह या खेळाडूंची हकालपट्टी केली

IPL 2023 : प्रीती पुन्हा करणार मोठी शॉपिंग, पंजाबने कॅप्टनसह या खेळाडूंची हकालपट्टी केली

IPL 2023 Updates : आयपीएल 2023 साठी पंजाब किंग्सने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर खेळाडूंना रिलीज केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 15 नोव्हेंबर : आयपीएल 2023 साठी पंजाब किंग्सने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर खेळाडूंना रिलीज केलं आहे. पंजाब किंग्सने सुरूवातीलाच मयंक अग्रवालऐवजी शिखर धवनची कर्णधार म्हणून नियुक्ती केली, तेव्हापासूनच मयंक अग्रवाल पंजाबची साथ सोडणार हे निश्चित झालं.

पंजाबने रिलीज केलेले खेळाडू

मयंक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा, ऋतीक चॅटर्जी

शिल्लक असलेली रक्कम : 32.2 कोटी रुपये

पंजाबची टीम लिलावात आणखी 3 परदेशी खेळाडू विकत घेऊ शकते.

पंजाबने रिटेन केलेले खेळाडू

शिखर धवन, शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षा, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार

पंजाबने एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू रिलीज केल्यामुळे लिलावामध्ये ते पुन्हा एकदा मोठी शॉपिंग करणार आहेत. रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर आता 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठीचा लिलाव होणार आहे. या लिलावाआधी म्हणजेच 15 नोव्हेंबरला रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला देणं प्रत्येक 10 टीमना बंधनकारक होतं.

First published:

Tags: Ipl, Punjab kings