मुंबई, 31 मार्च : जगप्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला आजपासून सुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध गुजरात या संघांमध्ये सुरु आहे. यासामन्यात फिल्डिंग करत असताना गुजरात संघाच्या केन विलियमसनला मोठी दुखापत झाली आहे.
आयपीएल च्या 16 व्या सीजनचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गत विजेत्या गुजरात टायटन यांच्यात सुरु आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या 12 षटकात चेन्नई संघाची धाव संख्या 120 पर्यंत पोहोचली तर गुजरातच्या गोलंदाजांनी चेन्नई सुपरकिंग्सच्या चार विकेट घेतल्या आहेत. परंतु याच दरम्यान गुजरात टायटनचा महत्वाचा खेळाडू केन विलियमसनला दुखापत झाली आहे.
Brilliant effort by kane Williamson Hope he is fine #IPLonJioCinema #IPL2023 #RuturajGaikwad #GTvCSK #Dhoni pic.twitter.com/ny0szhnqj1
— saifmd (@_saif_md_) March 31, 2023
चेन्नई आणि गुजरात यांच्यात रोमांचक सामना सुरु असताना चेन्नईचा फलंदाज अंबाती रायडू स्ट्राईकवर होता. यावेळी रायडूने बॉलवर जबरदस्त फटका मारला. रायडूने टोलवलेला बॉल हा बाउंड्रीच्या दिशेने येत होता. परंतु यावेळी केन विलियमसन धावत आला आणि त्याने बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात केन विलियमसन स्वतः बाउंड्रीच्या बाहेर पडला आणि जमिनीवर आदळला. यामुळे केनच्या पायाला दुखापत झाली आहे. पडल्यानंतर केन काहीवेळ वेदनेने कळवळत होता त्यानंतर गुजरात संघाच्या फिजीओ टीमने त्याला ट्रीट केले आणि काही वेळाने त्याला मैदानातून बाहेर घेऊन जाण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, CSK, Hardik pandya, IPL 2023