मुंबई, 6 मे : आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातने 9 विकेट्सने विजय मिळवून राजस्थानला त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभवाची धूळ चारली. परंतु या सामन्यात राजस्थानच्या एका खेळाडूने मारलेल्या शॉटमुळे मैदानातील कॅमेरामन जखमी झाला. तेव्हा मॅच सोडून जखमी व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या राशिद खानने प्रेक्षकांचे मन जिंकले. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना राजस्थान येथील स्वामी मानसिंह इंदूर स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु गुजरातच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे राजस्थानने 15 व्या ओव्हरपर्यंत 8 विकेट्स गमावल्या होत्या. तसेच राजस्थानची धाव संख्या देखील 100 च्या आत होती. तेव्हा राजस्थान चा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने फलंदाजी करून संघासाठी धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु या दरम्यान त्याने सीमारेषेबाहेर मारलेला बॉल थेट मैदानावरील कॅमेरामनच्या डोक्याला लागला.
Great gesture this from @rashidkhan_19 🤗👏🏻#TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/zWiTjvhqoF
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2023
डोक्याला बॉल लागताच कॅमेरामन विव्हळत खाली बसला तेव्हा गुजरात टायटन्स च्या फिजिओ टीमने त्याच्याजवळ धाव घेतली. जखमी झालेला व्यक्ती पाहून गुजरातचा गोलंदाज सामन्यामध्येच मैदानाची सीमारेषा ओलांडाऊन जखमी झालेल्या कॅमेरामनजवळ पोहोचला आणि राशिदने त्याची विचारपूस केली, त्यानंतर पुन्हा राशिद मैदानात परतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून राशिद खानच्या या कृतीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.