मुंबई, 7 मे : आयपीएल 2023 मध्ये रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात पांड्या ब्रदर्स कर्णधार म्हणून एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसले. दरम्यान गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या तुफान फटकेबाजी करत असताना भाऊ कृणाल पांड्याने कमाल कॅच पकडून त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे दोघे भाऊ वेगवेगळ्या संघांचे कर्णधार म्हणून एकमेकां विरुद्ध उभे राहिले. आयपीएलच्या इतिहासात असे प्रथमच घडले. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने दुखापतीच्या कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतल्याने नवा कर्णधार झालेला कृणाल पांड्या टॉससाठी आला. तेव्हा कृणालने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
Hardik Pandya gets dismissed after Krunal Pandya takes his catch. pic.twitter.com/QQ91lJMsm3
— Cricket is Love ❤ (@cricketfan__) May 7, 2023
गुजरात टायटन्सकडून प्रथम फलंदाजीसाठी ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिलची जोडी मैदानात उतरली. दोघांनी मैदानात तुफान फटकेबाजी करत संघासाठी तब्बल 142 धावांची पार्टनरशीप केली. परंतु १३ व्या ओव्हरमध्ये साहाची विकेट पडल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या मैदानात आला. त्याने ही 1 चौकार आणि 2 षटकार लगावून 15 चेंडूत 25 धावा केल्या. त्यानंतर मोशीन खानने टाकलेल्या बॉलवर शॉट मारण्याच्या प्रयत्नात असताना हार्दिक कॅच आउट झाला. लखनऊचा कर्णधार कृणाल पांड्यानेच त्याचा सुपर कॅच पकडून हार्दिकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.