जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 GT vs LSG : हार्दिक ब्रिगेड सुसाट, लखनऊ सुपर जाएंट्सचा दारुण पराभव

IPL 2023 GT vs LSG : हार्दिक ब्रिगेड सुसाट, लखनऊ सुपर जाएंट्सचा दारुण पराभव

हार्दिक ब्रिगेड सुसाट, लखनऊ सुपर जाएंट्सचा दारुण पराभव

हार्दिक ब्रिगेड सुसाट, लखनऊ सुपर जाएंट्सचा दारुण पराभव

आयपीएल 2023 मध्ये 51 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातने लखनऊवर दणदणीत विजय मिळवला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 मे : आयपीएल 2023 मध्ये 51 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातने लखनऊवर दणदणीत विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने 56 धावांनी लखनऊ सुपर जाएंट्सचा पराभव केला असून आयपीएलमधील 7 वा सामना जिंकून पॉईंट टेबलमध्ये अभेद्य आघाडी घेतली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार कृणाल पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. तेव्हा गुजरातकडून ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिलची जोडी मैदानात उतरली. दोघांनी मैदानात तुफान फटकेबाजी करत संघासाठी तब्बल 142 धावांची पार्टनरशीप केली. गुजरातकडून ऋद्धिमान साहाने 81, हार्दिक पांड्याने 25, डेविड मिलर 22 तर शुभमन गिलने नाबाद 94 धावांची खेळी केली. गुजरात टायटन्सने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 227 धावा केल्या.

News18लोकमत
News18लोकमत

गुजरातकडून विजयासाठी 228 धावांचे आव्हान मिळाले असताना लखनऊ सुपर जाएंट्सकडून काइल मेयर्स आणि क्विंटन डी कॉक हे दोघे मैदानात उतरले. लखनऊकडून काइल मेयर्सने 48, दीपक हुडाने 11, मार्कस स्टॉइनिसने 4, आयुष बडोनीने 21 तर क्विंटन डी कॉकने 70 धावा केल्या. परंतु अखेर विजयासाठी दिलेले आव्हान पूर्ण करू न शकल्याने लखनऊ सुपर जाएंट्सचा पराभव झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात