मुंबई, 29 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये शुक्रवारी 38 वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सने पंजाब किंग्स विरुद्ध फलंदाजी करताना मैदानावर धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे नेहमी रागात दिसणारा लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरचा वेगळ्या अंदाजात मैदानावर पाहायला मिळाला. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्सने तब्बल 56 धावांनी पंजाब किंग्सवर विजय मिळवला. सुरुवातीला टॉस जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजी निवडल्यानंतर लखनऊचा संघ मैदानात उतरला. यावेळी लखनऊच्या फलंदाजांनी पंजाबच्या होम ग्राउंडवर तुफान फटकेबाजी करून आयपीएल 2023 मधील सर्वाधिक म्हणजेच 257 धावांचा स्कोर उभा केला. विजयासाठी 20 ओव्हरमध्ये मिळालेले 258 धावांचे आव्हान पूर्ण करणे पंजाबला शक्य झाले नाही. त्यामुळे अखेर होम ग्राउंडवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
A performance that made Gambhir smile 😏#PBKSvLSG #TATAIPL #IPLonJioCinema #IPL2023 pic.twitter.com/NNKUBdr8Ky
— JioCinema (@JioCinema) April 28, 2023
पंजाब किंग्स समोर लखनऊने दिलेले आव्हान पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या. कर्णधार शिखर धवन शुन्यावर बाद झाला तर पंजाबच्या अनेक स्टार क्रिकेटर्सच्या विकेट घेण्यात लखनऊच्या गोलंदाजांना यश आले. तेव्हा यावेळी नेहमी रागात दिसणारा लखनऊ संघाचा मेंटॉर गौतम गंभीर आनंदात हातवारे करताना दिसला. सध्या गौतम गंभीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी बहुतेक वेळा गौतम गंभीरच आक्रमक रूप मैदानावर पाहायला मिळालं आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात देखील लखनऊने सामना जिंकल्यावर गंभीर आरसीबीच्या चाहत्यांना तोंडावर बोट ठेऊन हिणवताना दिसला होता.