मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2023 : पुढच्या वर्षी बदलणार आयपीएलचा फॉरमॅट, गांगुलीने केलं कन्फर्म

IPL 2023 : पुढच्या वर्षी बदलणार आयपीएलचा फॉरमॅट, गांगुलीने केलं कन्फर्म

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या नव्या हंगामाबाबत मोठी घोषणा केली आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या नव्या हंगामाबाबत मोठी घोषणा केली आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या नव्या हंगामाबाबत मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : भारतात क्रिकेटच्या वन-डे आणि टेस्ट मॅचबरोबरच टी-20चेही प्रचंड चाहते आहेत. या लोकप्रियतेमुळेच बीसीसीआयने (BCCI) 2008 सालापासून आयपीएल टी-2- क्रिकेट स्पर्धा सुरू केली. परंतु, गेली दोन वर्षं कोविड-19 मुळे स्पर्धेचे नियम व अटींमध्ये बदल केले गेले. ही स्पर्धा नव्या नियमांनुसार खेळवण्यात आली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली(Sourav Ganguly) यांनी आयपीएलच्या नव्या हंगामाबाबत मोठी घोषणा केली आहे. आयपीएल 2023(IPL) च्या हंगामात सहभागी राज्यांच्या टीम्स पुन्हा जुन्या फॉरमॅटनुसार खेळतील. जुन्या नियमांनुसार म्हणजे काय आणि कसं हे जाणून घेऊयात. भारतात खेळवल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध आयपीएल 20-20 क्रिकेट स्पर्धेत पुन्हा जुन्या नियमांचं पालन केलं जाणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी नियमावलीतील बदलांबाबत सहभागी टीम्सना पत्र आणि राज्य संघटनांना पाठवलं आहे. येत्या 2023ची आयपीएल स्पर्धा ही कोविड-19 पूर्व हंगामातील आयपीएलच्या नियमांवर आधारलेली असेल. हा नियम काय आहे? नियमांनुसार प्रत्येक टिमला आपल्या घरच्या मैदानावर आणि प्रतिस्पर्धी संघाच्या संघाच्या मैदानावर सामने खेळावे लागतील. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, “आयपीएलच्या नव्या हंगामात टीम्सना घरच्या मैदानावर आणि बाहेरच्या अर्थात पाहुण्या टीम्सच्या मैदानावर मॅचेस खेळाव्या लागतील. होम-अवे (IPL Home-Away Format) या फॉरमॅटनुसार स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. तसंच सगळ्या 10 टीम्स आपल्या ठरलेल्या घरच्या मैदानांवरच मॅच खेळतील.” बीसीसीआय 2020 नंतर पहिल्यांदाच संपूर्ण स्पर्धेचं आयोजन भारतात करत आहे. ज्यात सगळ्या टीम्स ठरलेल्या मॅचेस आपल्या घरी तर उरलेल्या दुसर्‍या राज्यात जाऊन खेळतील. जुन्या फॉरमॅटनुसार लीगचं आयोजन 2020 मध्ये आयपीएल स्पर्धा ही संयुक्त अरब अमिरातीत (UAE) भरवली गेली. ज्यात दुबई, शारजा आणि अबुधाबीमध्ये प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत मॅचेस खेळवल्या गेल्या. तसंच 2021 सालची आयपीएल टी-20 स्पर्धा भारतात झाली. ज्यात दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नईमध्ये या मॅचेस झाल्या होत्या. आता करोना महामारी आटोक्यात आली आहे. म्हणूनच जुन्या फॉरमॅटप्रमाणे स्पर्धा घेण्याचं बीसीसीआयने ठरवलं आहे. महिला आयपीएलची योजना बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला आयपीएल स्पर्धाचं प्लॅनिंग बीसीसीआय करत आहे. याबद्दल पीटीआय वृत्तसंस्थेने वृत्त दिलं होतं. ज्यात असं म्हटल होतं की महिला आयपीएल स्पर्धा ही दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या जाणार्‍या महिला टी-20 विश्वचषकानंतर मार्चमध्ये घेण्यात येईल. सौरव गांगुली यांनी 20 सप्टेंबरला दिलेल्या माहितीत म्हटलं होतं, “बीसीसीआय सध्या बहुप्रतिक्षित महिला आयपीएल स्पर्धेच्या नियोजनावर काम करत आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम पुढच्या वर्षीच्या सुरूवातीस असू शकेल.” याशिवाय बीसीसीआय मुलींसाठी अंडर-15 वन-डे मॅचेसही आयोजित करणार आहे.
First published:

Tags: Ipl, Saurav ganguli, Sourav ganguly, Sports

पुढील बातम्या