जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पावसाने फायनल जिंकण्याच टार्गेट बदललं, चेन्नई सुपरकिंग्स फायद्यात

पावसाने फायनल जिंकण्याच टार्गेट बदललं, चेन्नई सुपरकिंग्स फायद्यात

पावसाने फायनल जिंकण्याच टार्गेट बदललं, चेन्नई सुपरकिंग्स फायद्यात

पावसाने फायनल जिंकण्याच टार्गेट बदललं, चेन्नई सुपरकिंग्स फायद्यात

आयपीएल 2023 मध्ये आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच खेळवण्यात येत आहे. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सुरु असलेल्या मॅचमध्ये व्यत्यय आल्यामुळे आता गुजरातने मॅच जिंकण्यासाठी चेन्नईला दिलेले टार्गेट बदललं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अहमदाबाद, 30 मे : आयपीएल 2023 मध्ये आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच खेळवण्यात येत आहे. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स  यांच्यात सुरु असलेल्या मॅचमध्ये व्यत्यय आल्यामुळे आता गुजरातने मॅच जिंकण्यासाठी चेन्नईला दिलेले टार्गेट बदललं आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनची फायनल मॅच चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. या मॅचमध्ये सुरुवातीला टॉस जिंकून चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार एम एस धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  तेव्हा गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करून  20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स देऊन 214 धावा केल्या. विजयासाठी 20ओव्हरमध्ये 215 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्सचे फलंदाज मैदानात आले. परंतु पहिली ओव्हर सुरु  मैदानावर पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले. पावसामुळे मैदानावरील काही भाग ओला झाला होता. तेव्हा खेळ पुन्हा सुरु करताना कोणतीही समस्या येऊ नये म्हणून मैदान पूर्णपणे खेळण्या योग्य बनवण्यासाठी म्हणून सामना तब्बल 2 तास उशीरा म्हणजे रात्री 12 वाजून 10 मिनिटाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामना उशिरा सुरु होत असल्याने ही मॅच 15 ओव्हरची होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  त्यामुळे आता चेन्नई सुपरकिंग्सला विजयासाठी 15 ओव्हरमध्ये 171 धावांचे टार्गेट देण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात