जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सच्या पार्टीत राडा, खेळाडूनं केलं महिले सोबत गैरवर्तन

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सच्या पार्टीत राडा, खेळाडूनं केलं महिले सोबत गैरवर्तन

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूचं पार्टीत महिले सोबत गैरवर्तन, फ्रँचायझीने उचललं मोठे पाऊल

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूचं पार्टीत महिले सोबत गैरवर्तन, फ्रँचायझीने उचललं मोठे पाऊल

दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या सेलिब्रेशन पार्टीत एका खेळाडूने महिले सोबत गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर फ्रँचायझीकडून कठोर नियम करण्यात आले आहत

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 24 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात दिल्लीने हैद्राबादवर 8 धावांनी विजय मिळवून यंदाच्या आयपीएल मधील दुसरा सामना जिंकला. परंतु या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या सेलिब्रेशन पार्टीत एका खेळाडूने महिले सोबत गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या पार्टीत खेळाडूकडून महिले सोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकार करणाऱ्या खेळाडूचे नाव अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीकडून या प्रकारानंतर कठोर नियम करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास  दंड किंवा फ्रँचायझीकडून खेळाडूंचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले जाऊ शकते.

News18लोकमत
News18लोकमत

महिले सोबत गैरवर्तनाचा प्रकार घडल्यानंतर रात्री 10 नंतर दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या रुममध्ये कोणत्याही पाहुण्याला नो एन्ट्री असेल. तसेच दिवसभरता कधीही खेळाडूंच्या रुमममध्ये प्रवेश करण्यासाठी पाहुण्यांना परवानगी घेणं आवश्यक असणार असल्याचे  फ्रेंचायजीने स्पष्ट केलय. खेळाडूंच्या रुममध्ये जाण्यासाठी पाहुण्यांना फोटो ओळखपत्र आणि आयपीएल अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असेल. हॉटेलमधून बाहेर जाताना खेळाडूंना फ्रेंचायजीला सांगण बंधनकारक आहे. पत्नी आणि गर्लफ्रेंड हे खेळाडूला भेटण्यासाठी येऊ शकतात परंतु त्यांचा खर्च खेळाडूंना स्वतः करावा लागेल तसेच कुटुंबिय येत असतील, तर खेळाडूंना तस फ्रेंचायजीला सांगाव लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात