मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2023 : कॅप्टनसाठी काय पण! दिल्लीने जिंकलं मन, टीममध्ये नसलेल्या पंतसाठी काय केलं पाहा

IPL 2023 : कॅप्टनसाठी काय पण! दिल्लीने जिंकलं मन, टीममध्ये नसलेल्या पंतसाठी काय केलं पाहा

कॅप्टनसाठी काय पण! दिल्लीने जिंकलं मन, टीममध्ये नसलेल्या पंतसाठी काय केलं पाहा

कॅप्टनसाठी काय पण! दिल्लीने जिंकलं मन, टीममध्ये नसलेल्या पंतसाठी काय केलं पाहा

आयपीएलचा तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात खेळवला जात आहे. या दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या नव्या सीजनमधील पहिला सामना खेळताना त्यांचा दुखापतग्रस्त माजी कर्णधार रिषभ पंतची आठवण ठेवली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 एप्रिल : आयपीएल 2023 ला 31 मार्च पासून सुरुवात झाली आहे. आयपीएलचा तिसरा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यात खेळवला जात आहे. या दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या नव्या सीजनमधील पहिला सामना खेळताना त्यांचा दुखापतग्रस्त माजी कर्णधार रिषभ पंतची आठवण ठेवली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि भारताचा स्टार खेळाडू रिषभ पंत सध्या दुखापतग्रस्त आहे. रिषभच्या कारला 30 डिसेंबर 2022 ला भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ गंभीर जखमी झाला होता. यामुळे रिषभच्या पायावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून तो सध्या दुखापतीतून सावरत असलयाने यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत नाही. परंतु रिषभ सध्या दिल्ली कॅपिटल्स सोबत आयपीएलमध्ये खेळत नसला तरी त्याच्या संघाने एक खास गोष्ट करून त्याची आठवण ठेवली आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलचाय नव्या सीजनमध्ये सामना खेळत असताना आपल्या संघाच्या डग आऊटमध्ये रिषभची जर्सी लावून ठेवली आहे. दिल्ली कॅपिटल्सने केलेल्या याकृतीमुळे सर्वांचे मन जिंकले आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Delhi capitals, IPL 2023, Rishabh Pant