जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 DC vs PBKS : पंजाब किंग्सच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला दिलासा

IPL 2023 DC vs PBKS : पंजाब किंग्सच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला दिलासा

पंजाब किंग्सच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला दिलासा

पंजाब किंग्सच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला दिलासा

आयपीएल 2023 मधील 64 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा पराभव केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

उत्तराखंड, 17 मे : आयपीएल 2023 मधील 64 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा पराभव केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने 15 धावांनी पंजाब किंग्सवर विजय मिळवला असून त्यांनी आयपीएल 2023 मधील पाचवी मॅच जिंकली. या सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव झाल्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या मुंबई इंडियन्सला काहीसा दिलासा मिळाला आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स घालवून 213 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 46, पृथ्वी शॉने 54 , रायली रासवने 82 तर फिलिप्स सॉल्टने 26 धावा केल्या. तर पंजाबच्या गोलंदाजांपैकी सॅम करनलाच 2 विकेट घेणं शक्य झालं. पंजाब किंग्सला विजयासाठी 214 धावांचे आव्हान मिळाले असताना पंजाबच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये शिखर धवनची विकेट पडली. नंतर पंजाब किंग्सकडून फलंदाज प्रभसिमरनने 22, अथर्व टाइडेने 55, लिविंगस्टोनने 94 तर सॅम करनने 11 धावा केल्या. पण अखेर पंजाब किंग्सचा संघ विजयाचे आव्हान पूर्ण करण्यापासून 15 धावा मागे राहिला.

News18लोकमत
News18लोकमत

पंजाब किंग्सच्या पराभवामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या रेसमध्ये असणाऱ्या मुंबई इंडियन्सला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याच असं की आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ 7 सामने जिंकून 14 पॉईंट सह चौथ्या स्थानावर आहे, तर साखळी सामन्यांपैकी मुंबईचा केवळ एकच सामना शिल्लक आहे. तर पंजाब किंग्सकाह संघ पॉईंट टेबलमध्ये 8 व्या स्थानावर असून त्यांचे 12 पॉईंट्स आहेत. जर आज पंजाबचा संघ सामना जिंकला असता तर त्यांचे 14 पॉईंट्स होऊन त्यांनी मुंबई इंडियन्सच्या पॉईंट्सशी बरोबरी केली असती. त्यामुळे मुंबईची डोकेदुखी वाढली असती. परंतु पंजाबचा पराभव झाल्यामुळे मुंबईला काहीसा दिलासा मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात