मुंबई, 2 मे : आयपीएल 2023 मध्ये 44 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात दिल्लीने गुजरातचा पराभव केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर 5 धावांनी विजय मिळवला असून आयपीएल 2023 मधील तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. शमीने सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्ये दिल्लीच्या चार विकेट्स घेतल्या तर डेविड वॉर्नरहा नो बॉलवर रन आउट झाला. दिल्ली कपिटल्सकडून प्रियम गर्गने 10, अक्षर पटेलने 27, अमन खानने 51 तर रिपल पटेलने 23 धावा केल्या. तर इतर कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धाव संख्या करता आली नाही.
दिल्ली कॅपिटल्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 130 धावा केल्या, तर गुजरातला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले. यावेळी गुजरातच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली सुरुवातीला सलामी फलंदाज म्हणून आलेल्या शुभमन गिल आणि रिद्धीमान साहा या दोघांच्या स्वस्तात विकेट पडल्या. परंतु यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने मैदानावर भक्कमपणे उभे राहून संघासाठी नाबाद 59 धावा केल्या. हार्दिक पांड्या वगळता गुजरातकडून केवळ अभिनव मनोहरने 26 तर राहुल तेवाटियाने 20 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्या रन्स घेऊन सामना जिंकणार असे वाटत असताना इशांत शर्माने भेदक गोलंदाजी केली.
A resounding away victory for @DelhiCapitals 🥳🥳#DC was full of belief tonight and they register a narrow 5-run win in Ahmedabad 👏🏻👏🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
Scorecard ▶️ https://t.co/VQGP7wSZAj#TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/GWGiTIshFY
इशांत शर्माने अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरातला 12 धावांची आवश्यकता असताना केवळ 6 धावा दिल्या तसेच राहुल तेवाटियाची विकेट देखील घेतली. त्यामुळे अखेर विजयाचे आव्हान पूर्ण करता न आल्याने गुजरात टायटन्सचा 5 धावांनी पराभव झाला.