मुंबई, 24 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. सनरायजर्स हैद्राबादच्या होम ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने हैद्राबादचा खेळाडू भुवनेश्वर कुमारचे पाय पकडले. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैद्राबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर आयपीएल 2023 चा 34 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्याच्या निमित्ताने सनरायजर्स हैद्राबादचा माजी कर्णधार आणि सध्या दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला डेव्हिड वॉर्नर तब्बल चार वर्षांनी राजीव गांधी स्टेडियमवर परतला. सामन्याच्या पूर्वी डेव्हिड वॉर्नरने सनरायजर्स हैद्राबादच्या काही जुन्या खेळाडूंशी भेटीगाठी केल्या यादरम्यान त्याने स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारला भेट घेताना त्याने प्रथम सूर्यकुमारचे पाय धरले आणि मग त्याला मिठी मारली.
डेव्हिड वॉर्नरने केलेल्या या कृतीमुळे त्याने हैद्राबादच्या चाहत्यांचे मन जिंकले. 2016 मध्ये सनरायजर्स हैद्राबादने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या विजेत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. 2021 पर्यंत सलग 7 वर्ष डेव्हिड वॉर्नर सनरायजर्स हैद्राबाद संघाचा भाग होता परंतु गेल्यावर्षी त्याला दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल लिलावा दरम्यान विकत घेतले. डेव्हिड वॉर्नर मैदानात आल्यावर हैद्राबादच्या चाहत्यांनी देखील त्याचे जल्लोषात स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.