जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 CSK vs PBKS : पंजाब किंग्सचा थरारक विजय, चेन्नई सुपरकिंग्सला होमग्राउंडवर पराभवाचा धक्का

IPL 2023 CSK vs PBKS : पंजाब किंग्सचा थरारक विजय, चेन्नई सुपरकिंग्सला होमग्राउंडवर पराभवाचा धक्का

पंजाब किंग्सचा थरारक विजय, चेन्नई सुपरकिंग्सला होमग्राउंडवर पराभवाचा धक्का

पंजाब किंग्सचा थरारक विजय, चेन्नई सुपरकिंग्सला होमग्राउंडवर पराभवाचा धक्का

आयपीएल 2023 मध्ये 41 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने सीएसकेचा पराभव केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 41 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने सीएसकेचा  पराभव केला आहे.  पंजाब किंग्सने चेन्नई सुपरकिंग्सवर 4 विकेट्सने  विजय मिळवला असून आयपीएलमधील 5 वा सामना जिंकला आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून सीएसकेचा कर्णधार एम एस धोनीने प्रथम फलंदाजीचा  निर्णय घेतला. सीएसकेकडून  ऋतुराज गाईकवाडने 37, डेव्हॉन कॉन्वेने नाबाद 92, शिवम दुबेने 28, मोईन अलीने 10, रवींद्र जडेजाने 12 तर एम एस धोनीने 13 धावा केल्या. सीएसकेच्या फलंदाजी दरम्यान डेव्हॉन कॉन्वेची नाबाद खेळी 92 खेळी सर्वात लक्षवेढी ठरली त्याने केवळ 52  चेंडूत मोठा स्कोर उभा केला. तसेच शेवटच्या 2 बॉलवर एम एस धोनीने 2 सिक्स मारून सीएसकेची धाव संख्या 200 पर्यंत पोहोचवली.

News18लोकमत
News18लोकमत

पंजाब किंग्सला विजयासाठी 201 धावांचे आव्हान मिळाले असताना 28 धावा करून कर्णधार शिखर धवनची पहिली विकेट पडली. त्यानंतर पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंहने 42, अथर्व तायडे 13, लिविंगस्टोनने 40, सॅम करनने 29, तर जितेश शर्माने 21 तर सिकंदर रझाने 13 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असताना पंजाबचा खेळाडू सिकंदर रझाने चौकार मारून चेन्नई सुपरकिंग्सला त्यांच्या होम ग्राउंडवर पराभवाचा धक्का दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात