मुंबई, 8 एप्रिल : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. आरसीबी विरुद्ध आयपीएल 2023 चा पहिला सामना हरलेली मुंबईत इंडियन्स होम ग्राउंडवर विजयी पताका लावण्यासाठी मैदानात झुंज देत आहे. दरम्यान चेन्नईचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने स्वतः टाकलेल्या बॉलवर घेतलेला सनसनाटी कॅच पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स तब्बल दोन वर्षांनी आयपीएलचा सामना खेळत आहे. एम एस धोनीने या सामन्याच्या सुरुवातीला टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धोनीने घेतलेला निर्णय त्याच्या गोलंदाजांनी खरा ठरवला आणि 15 ओव्हरमध्ये 6 विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सकडून कोणत्याही फलंदाजाला संघासाठी समाधानकारक कामगिरी करता आली नाही. एका मागोमाग एक विकेट पडत असताना रवींद्र जडेजा ने कॅमेरून ग्रीनची घेतलेली विकेट सर्वाधिक लक्षवेधी ठरली.
HOW DOES HE DO THAT!? 🤯@imjadeja grabs an absolute worldie off his own bowling! This man has MAGNETS for hands, much to the umpire's relief! 😅
— Star Sports (@StarSportsIndia) April 8, 2023
Tune-in to #MIvCSK at #IPLonStar LIVE on Star Sports Network. #ShorOn #GameOn #BetterTogether https://t.co/dchTMP19oy
रवींद्र जडेजाने 8 व्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला. यावेळी त्याने स्ट्राईकवर असलेल्या कॅमेरून ग्रीनला ओव्हरमधील पहिलाच बॉल टाकला. या बॉलवर ग्रीन शॉट मारायला गेला परंतु त्याच्या समोरच उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाने क्षणार्धात हा जबरदस्त कॅच पकडला. ग्रीनने मुंबईसाठी 11चेंडूत केवळ 12 धावा केल्या. रवींद्र जडेजाने पकडलेल्या या कॅचचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.