जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 CSK vs LSG : माही मार रहा है, धोनीने गाजवलं मैदान, केला नवा रेकॉर्ड

IPL 2023 CSK vs LSG : माही मार रहा है, धोनीने गाजवलं मैदान, केला नवा रेकॉर्ड

माही मार रहा है, धोनीने गाजवलं मैदान, केला नवा रेकॉर्ड

माही मार रहा है, धोनीने गाजवलं मैदान, केला नवा रेकॉर्ड

आयपीएलच्या 16 व्या सीजनचा सहावा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सुरु असून यात धोनीने नवा रेकॉर्ड नावावर केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 3 एप्रिल : आयपीएल 2023 ला सुरुवात झाली असून यामध्ये प्रेक्षकांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आज आयपीएलच्या 16 व्या सीजनचा सहावा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सुरु असून यात धोनीने नवा रेकॉर्ड नावावर केला आहे. यासोबतच चेन्नईने लखनऊ सुपर जाएंट्सला विजयासाठी 218 धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध लखनऊ यांच्यात सामना सुरु असून तब्बल 4 वर्षांनी चेन्नईचा संघ आपल्या होम ग्राउंडवर खेळत आहे. सामन्यात   लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार के एल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी चेन्नईच्या संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे हे दोघे सलामीसाठी मैदानात आले. यावेळी ऋतुराज गायकवाडने संघासाठी 57 धावा केल्या. तर डेव्हॉन कॉनवेने 47 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी देखील चेन्नईसाठी समाधानकारक कामगिरी करून धाव संख्या 200 पार पोहोचवली. IPL 2023 CSK vs LSG : ऋतुराजचा सुपर सिक्स, टाटाच्या कारवर आदळला बॉल, अशी झाली अवस्था

News18लोकमत
News18लोकमत

शेवटच्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजाची विकेट पडल्यानंतर एम एस धोनी मैदानावर आला. त्याने येताच षटकारांची आतिशबाजी करण्यास सुरुवात केली. धोनीने 2 चेंडूवर सलग २ षटकार लगावले. परंतु तिसऱ्या चेंडूवर शॉट मारताना तो झेल बाद झाला. परंतु धोनीने चेपॉक स्टेडियमवर 12 धावा करून आयपीएल कारकिर्दीत 5 हजार धावांचा टप्पा गाठला. धोनीने आयपीएलमध्ये खेळलेल्या 236 सामन्यांमध्ये 5 हजार 4 धावा केल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात