Home /News /sport /

IPL 2022 : हार्दिकला मुंबई इंडियन्सने बाहेर का केलं? झहीर खानने सांगितली Inside Story

IPL 2022 : हार्दिकला मुंबई इंडियन्सने बाहेर का केलं? झहीर खानने सांगितली Inside Story

हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) 2021 हे वर्ष निराशाजनक राहिलं. या ऑलराऊंडरला आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी करता आली नाही, ज्यामुळे मुंबई इंडियन्सनाही (Mumbai Indians) प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 6 जानेवारी : हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) 2021 हे वर्ष निराशाजनक राहिलं. या ऑलराऊंडरला आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी करता आली नाही, ज्यामुळे मुंबई इंडियन्सनाही (Mumbai Indians) प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळाला नाही. यानंतर टी-20 वर्ल्ड कपमध्येही (T20 World Cup 2021) हार्दिक अपयशी ठरला आणि टीम इंडिया सुपर-12 राऊंडमधूनच बाहेर झाली. आयपीएल 2022 साठी मुंबई इंडियन्सनी हार्दिकला रिटेन केलं नाही. आता एकतर त्याला दोन नव्या टीममधली एक टीम विकत घेईल किंवा लिलावात उतरावं लागेल. हार्दिक पांड्याचा फिटनेस सध्या खराब आहे, ज्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धची सीरिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळालं नाही. मुंबई इंडियन्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स झहीर खान (Zaheer Khan) याने टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. याबाबत त्याने मुंबई इंडियन्सच्या रणनितीबद्दल सांगितलं. 'खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय वेगवेगळे पैलू पाहून घेतला जातो. याबाबतची चर्चा बराच वेळ चालते. ही प्रक्रिया सोपी नसते. जेव्हा तुम्ही मोठ्या लिलावाची तयारी करत असता, तेव्हा कठोर मनाने अनेक खेळाडूंना बाहेर करावं लागतं, ज्यांच्यासोबत तुम्ही खूप वेळ घालवलेला असतो,' असं झहीर म्हणाला. आयपीएलच्या जुन्या 8 टीमनी एकूण 27 खेळाडूंना कायम ठेवलं, तर 2 नव्या टीम लखनऊ आणि अहमदाबाद प्रत्येकी 3-3 खेळाडूंना लिलावाआधी विकत घेऊ शकणार आहे. हार्दिक पांड्या लवकरच जुना फिटनेस परत मिळवले आणि फॉर्ममध्ये येईल, अशी अपेक्षा झहीर खानने व्यक्त केली आहे. हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्यालाही (Krunal Pandya) मुंबई इंडियन्सने रिटेन केलं नाही. हे दोन्ही भाऊ आयपीएलची नवीन टीम अहमदाबादकडून खेळताना दिसू शकतात. रोहितसह 4 खेळाडू रिटेन मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल 2021 ची ट्रॉफी चेन्नई सुपर किंग्सला (CSK) मिळाली, हा त्यांचा चौथा किताब होता. मुंबईने 2022 च्या मोसमासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं आहे. पुढच्या महिन्यामध्ये आयपीएलचा लिलाव होणार आहे, पण देशात वाढणाऱ्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे लिलावाची तारीख आणि ठिकाण पुढे ढकललं जाऊ शकतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Hardik pandya, Ipl 2022 auction, Mumbai Indians, Zaheer Khan

    पुढील बातम्या