जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 'याचा मुंबई इंडियन्सनाच फायदा', आयपीएल टीमच्या तक्रारीनंतर BCCI तो निर्णय बदलणार!

IPL 2022 : 'याचा मुंबई इंडियन्सनाच फायदा', आयपीएल टीमच्या तक्रारीनंतर BCCI तो निर्णय बदलणार!

IPL 2022 : 'याचा मुंबई इंडियन्सनाच फायदा', आयपीएल टीमच्या तक्रारीनंतर BCCI तो निर्णय बदलणार!

मार्चच्या अखेरच्या आठवड्यात आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमाला सुरूवात होणार आहे, पण या मोसमाआधीच नवा वाद निर्माण झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 फेब्रुवारी : मार्चच्या अखेरच्या आठवड्यात आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमाला सुरूवात होणार आहे, पण या मोसमाआधीच नवा वाद निर्माण झाला आहे. आयपीएल वेळापत्रकाच्या घोषणेआधी प्रत्येक टीमना सामने कुठे खेळवले जाणार, याबाबत माहिती देण्यात आली. आयपीएलच्या 15 व्या मोसमात एकूण 70 मॅच होणार आहेत, यातल्या 55 मॅच मुंबईमध्ये तर 15 मॅच पुण्यात होणार आहेत, पण मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणाऱ्या सामन्याबाबत आयपीएल टीमनी आक्षेप घेतले आहेत. वानखेडे स्टेडियम मुंबई इंडियन्सचं होम ग्राऊंड आहे, याचा फायदा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमला होईल, असं आयपीएलच्या इतर टीमना वाटत आहे. कोरोना व्हायरसमुळे प्रवास कमी करण्यासाठी आयपीएल महाराष्ट्रामध्येच खेळवण्याचा निर्णय बीसीसीआय घेत आहे. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनीही याबाबत माहिती दिली. वानखेडे स्टेडियमसह डीवाय पाटील स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि पुण्यातील स्टेडियम या 4 ठिकाणी आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. टीमनी आक्षेप घेतल्यानंतर आता बीसीसीआय याबाबत निर्णय घेऊ शकते. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार इतर टीमना मुंबई इंडियन्सचे सामने डीवाय पाटील किंवा दुसऱ्या कोणत्याच स्टेडियममध्ये खेळवण्याबाबत आक्षेप नाहीत. बीसीसीआयनेही कोणालाच होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही, असं टीमना आश्वस्त केलं आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये सगळ्या 10 टीमना सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्याचं आव्हानही बीसीसीआयसमोर आहे. यासाठी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या मैदानाचाही वापर केला जाऊ शकतो. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे बीसीसीआय स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशाला परवानगी देऊ शकते. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला 26 किंवा 27 मार्चपासून सुरूवात होऊ शकते, तर फायनल मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होईल. 12 आणि 13 फेब्रुवारीला आयपीएलचा लिलाव झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात