
मुंबई, 1 डिसेंबर: आयपीएल 2022 पूर्वी अनेक बड्या खेळाडूंना फ्रँचायझींनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये केएल राहुल (KL Rahul), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांचा समावेश आहे. त्यांना खरेदी करण्यासाठी आता सर्व टीममध्ये जोरदार चुरस (Bidding War) रंगणार आहे. (Instagram)

टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू असलेल्या केएल राहुलला पंजाब किंग्जने (Punjab Kings) रिटेन केलेले नाही. राहुल विकेटकिपर देखील आहे. त्यानं आजवर आयपीएलमधील 94 मॅचमध्ये 3273 रन केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. (AFP)

आयपीएल इतिहासात सर्वात जास्त रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिखर धवनला दिल्ली कॅपिटल्सनं रिटेन केलेलं नाही. धवननं आयपीएलमध्ये 5784 रन काढले आहेत. सर्वाधिक रन बनवण्याच्या बाबतीमध्ये फक्त विराट कोहली (Virat Kohli) 6283 रनसह धवनच्या पुढे आहे. ( PTI)

टेस्ट क्रिकेटमध्ये नुकतंच दमदार पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरलाही दिल्ली कॅपिटल्सनं रिटेन केलेलं नाही. श्रेयस या टीमचा कॅप्टनही होता. त्याच्या कॅप्टनसीमध्ये दिल्लीनं फायनलमध्ये धडक मारली होती. त्यानं या स्पर्धेत 87 मॅचमध्ये 2375 रन काढले आहेत. यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश आहे. (AFP)

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नरला (David Warner) सनरायझर्स हैदराबादनं (SRH) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वॉर्नरनं 150 आयपीएल मॅचमध्ये 5449 रन काढले आहेत. यामध्ये 4 शतक आणि तब्बल 50 अर्धशतकांचा समावेश आहे. (AFP)

अनुभवी स्पिनर आर. अश्विनलाही दिल्ली कॅपिटल्सनं रिटेन केलेलं नाही. अश्विननं आयपीएल 2021 मधील 13 मॅचमध्ये 7 विकेट्स घेतल्या होत्या. तो नुकताच टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा भारतीय ऑफ स्पिनर बनला आहे. (PTI)

5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला रिलीज केले आहे. हार्दिक सध्या दुखापतीनं त्रस्त आहे. हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्यालाही मुंबईनं बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (Hardik Pandya/Instagram)

अफगाणिस्तानचा स्टार बॉलर राशिद खानला (Rashid Khan) वगळण्याचा धक्कादायक निर्णय सनरायझर्स हैदराबादनं घेतला आहे. राशिद आयपीएलसह जगभरातील T20 लीगचा प्रमुख खेळाडू आहे. (AFP)




