टीम इंडियाचा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) सध्या चांगलाच फॉर्मात आहे. त्याने वेस्ट इंडिज विरूद्धच्या वन-डे सीरिजमधील 2 मॅचमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. बुधवारी झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये त्यानं 12 रन देत 4 विकेट्स घेतल्या. कृष्णाला आयपीएल लिलावात चांगला भाव मिळू शकतो. तो यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा सदस्य होता. (AP)
प्रसिद्ध कृष्णानं बुधवारी झालेल्या वन-डेमध्ये टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. या कामगिरीबद्दल त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. कृष्णानं पहिल्या वन-डेमध्ये 29 रन देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. (AFP)
प्रसिद्ध कृष्णानं आत्तापर्यंतच्या आयपीएल करिअरमध्ये 34 सामने खेळले असून त्यामध्ये 30 विकेट्स घेतल्या आहेत. तर टीम इंडियाकडून 6 आंतरराष्ट्रीय वन-डेमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. (Instagram)
प्रसिद्ध कृष्णा मागील आयपीएल सिझन कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लिलावात कोलकाता कृष्णावर पुन्हा बोली लावेल, अशी फॅन्सना आशा आहे. पंजाब किंग्जनं फक्त 2 खेळाडू रिटेन केले आहेत. पंजाबही कृष्णावर बोली लावू शकते. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स देखील कृष्णाला खरेदी करण्याच्या शर्यतीमध्ये आहे. (Instagram)
बुधवारी, दुसऱ्या वन-डे नंतर बोलताना कृष्णानं सांगितलं की, 'मी बऱ्याच काळापासून या प्रकारचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत होतो. आज मी योग्य दिशेनं बॉलिंग केली तसंच टीमला विजय मिळाला याचा आनंद आहे. (AFP)
प्रसिद्ध कृष्णाचा 19 फेब्रुवारी रोजी 26 वा वाढदिवस आहे. दुसऱ्या वन-डेमधील कामगिरीवर बोलताना कृष्णा पुढे म्हणाला की, 'मी बॅटींगला गेलो त्याचवेळी बॉल सिम होत होता. पिच माझ्या बॉलिंगला मदत करू शकते हे मला तेव्हाच लक्षात आले. मी फक्त अचूक टप्प्यावर योग्य लेन्थनं बॉलिंग करण्याचे ठरवले होते. (Instagram/skiddyy)