Home /News /sport /

IPL 2021 : हार्दिक पांड्या बॉलिंग करणार का नाही? झहीर खानने दिलं उत्तर

IPL 2021 : हार्दिक पांड्या बॉलिंग करणार का नाही? झहीर खानने दिलं उत्तर

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरुवात (IPL 2021) मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) मुंबईचा शेवटच्या बॉलवर पराभव केला. या सामन्यात मुंबईने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) बॉलिंग दिली नाही.

पुढे वाचा ...
    चेन्नई, 12 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरुवात (IPL 2021) मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) मुंबईचा शेवटच्या बॉलवर पराभव केला. या सामन्यामध्ये मुंबईला सहाव्या बॉलरची कमी जाणवल्याची प्रतिक्रिया टीमचा ओपनर क्रिस लीनने (Chris Lynn) दिली. तसंच या सामन्यात हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) बॉलिंग का देण्यात आली नाही, यावरूनही प्रश्न विचारण्यात आले. मुंबई इंडियन्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स झहीर खानने (Zaheer Khan) याचं उत्तर दिलं आहे. 'हार्दिक पांड्याच्या वर्क लोड मॅनेजमेंटमुळे त्याला बॉलिंग देण्यात आली नाही. मुंबई इंडियन्सच्या फिजियोंसोबत बोलून आणि त्यांच्या सल्ल्याने हा निर्णय घेण्यात आला. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये हार्दिकने 9 ओव्हर बॉलिंग केली, त्यामुळे फिजियोसोबत सल्लामसलत करून त्याला पहिल्या सामन्यात बॉलिंग न द्यायचा निर्णय घेण्यात आला,' असं झहीर खान क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला. हार्दिक पांड्याच्या खांद्याला थोडा त्रास होत आहे, पण यात काळजी करण्यासारखं काहीच नाही. लवकरच तो बॉलिंगही करेल, पण तो नेमका कधी बॉलिंगसाठी उपलब्ध असेल, हे मुंबई इंडियन्सचे फिजियो सांगू शकतील, असंही झहीरने स्पष्ट केलं. तसंच कायरन पोलार्ड हा मुंबईचा सहावा बॉलिंगचा पर्याय आहे, तसंच जेव्हा हार्दिक उपलब्ध असेल, तेव्हा तोदेखील बॉलिंग करेल. बॉलिंगविषयी आम्ही फार चिंतेत नाही, पण घरच्या मैदानात खेळत नसल्यामुळे टीमला लवचिकता दाखवावी लागेल, अशी प्रतिक्रिया झहीरने दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Hardik pandya, IPL 2021, Mumbai Indians, Zaheer Khan

    पुढील बातम्या