IPL 2021: दिल्ली-अहमदाबादमधील बायोबबल का बारगळलं? या कारणामुळे फसलं नियोजन

IPL 2021: दिल्ली-अहमदाबादमधील बायोबबल का बारगळलं? या कारणामुळे फसलं नियोजन

सरावासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, त्यामुळेच कोरोनाची मार्गदर्शक तत्वे येथे पाळली गेली नाहीत आणि बरेच खेळाडू आणि सहायक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले. सरावादरम्यान कोरोना नियम पाळले न गेल्यानं आयपीएल 29 सामन्यांनंतर थांबवावी लागली.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे: क्रिकेट प्रेमींची आवडती लीग आयपीएल 2021 (IPL 2021) यावेळी काही खेळाडू आणि सहायक कर्मचार्‍यांना कोरोना लागण (Corona in IPL 2021) झाल्यानंतर स्थगित करण्यात आली आहे. उर्वरित सामने आता काही दिवसांनी होणार आहेत. मात्र, ही स्पर्धा पुढे ढकलण्यामागील खरे कारण आता समोर आले आहे. आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्यासाठी दिल्ली आणि अहमदाबादची निवड बीसीसीआयने केली होती. मात्र, या ठिकाणी सरावासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, त्यामुळेच कोरोनाची मार्गदर्शक तत्वे येथे पाळली गेली नाहीत आणि बरेच खेळाडू आणि सहायक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आले. सरावादरम्यान कोरोना नियम पाळले न गेल्यानं आयपीएल 29 सामन्यांनंतर थांबवावी लागली.

या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिका्याने वृत्तसंस्था आयएएनएसला सांगितले की, बोर्ड आणि राज्य क्रिकेट संघटनांच्या मते दिल्ली आणि अहमदाबाद येथे दुसरा टप्पा ठेवण्याचा निर्णय चुकीचा होता. मुख्य मैदानांव्यतिरिक्त प्रत्येक शहरात चार संघ होते, जे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधांनी सुसज्ज होते आणि तेथे सामनेही घेण्यात आले. खेळांडूंसाठी जी सराव मैदाने होती तेथे कोरोना नियम पाळणे अवघड होते. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संपर्कात येण्याचे प्रमाण वाढत गेले.

हे वाचा - नेमकं घडतंय काय! वर्षभरापासून फ्रिजर ट्रकमध्ये स्टोर आहेत 750 कोरोना रुग्णांचे मृतदेह, अजूनही मिळेना जागा

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने दिल्लीत रोशनारा क्लबच्या मैदानावर सराव केला. त्याचबरोबर अहमदाबादमध्येही चांगल्या सुविधा नसल्यामुळे गुजरात कॉलेजच्या मैदानावर त्यांना सराव करावा लागला. या दोन शहरांमधील सरावाची ठिकाणे गर्दीच्या किंवा जुन्या भागामध्ये होती. त्यामुळे खेळाडूंना कोरोनाची लागण होण्याची शक्यता होती.

अहमदाबामध्ये अडचणींचा सामना

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मोटेरा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमची समस्या ही आहे की, आजूबाजूचे मैदान अद्याप पूर्णपणे तयार झालेले नाही. सरावा दरम्यान खेळाडू येथे मोठे शॉट खेळू शकले नाहीत. या कारणास्तव संघांना गुजरात महाविद्यालयाच्या मैदानावर सराव करण्यासाठी जावे लागले आणि तिकडे खेळाडूंना पाठवण्यात धोका होता. कारण तेथे माळी, सुरक्षा कर्मचारी आणि इतर बरेच कर्मचारी आधीच कार्यरत होते आणि खेळाडूंना लागण होण्याची शक्यता जास्त होती. कोलकाता नाईट रायडर्स व्यतिरिक्त अन्य दोन संघांनी या मैदानावर सराव केला आणि नंतर केकेआरचे चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

Published by: News18 Desk
First published: May 11, 2021, 2:17 PM IST

ताज्या बातम्या