मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : आयपीएल टीमच्या सरावाला राज्य सरकारची परवानगी, पण...

IPL 2021 : आयपीएल टीमच्या सरावाला राज्य सरकारची परवानगी, पण...

एकीकडे आयपीएल (IPL 2021) तोंडावर आलेली असताना राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत, त्यामुळे आयपीएलच्या मुंबईतल्या मॅचवर संकट ओढावलं होतं. पण राज्य सरकारने आता आयपीएलला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 5 एप्रिल : एकीकडे आयपीएल (IPL 2021) तोंडावर आलेली असताना राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत, त्यामुळे आयपीएलच्या मुंबईतल्या मॅचवर संकट ओढावलं होतं. पण राज्य सरकारने आता आयपीएलला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आयपीएल मॅचसाठी टीमना सराव करायला परवानगी देण्यात आली आहे. आयपीएलच्या टीमना दोन सत्रात सराव करता येणार आहे. दुपारी 4 ते संध्याकाळी 6.30 आणि संध्याकाळी 7.30 ते रात्री 10 या कालावधीमध्ये टीमना आणि स्टाफना मैदानात सराव करायला परवानगी देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये टीम हॉटेल ते मैदान असा प्रवास करू शकतील.

9 एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. मुंबईमध्ये यावर्षी आयपीएलचे 10 सामने होणार आहेत. मुंबईमध्ये 10 ते 25 एप्रिल दरम्यान 10 मॅच होणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या चार टीमचे सामने मुंबईमध्ये होतील. दुसरीकडे महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले तरी तिकडे आयपीएलचे सामने होतील, असं बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) स्पष्ट केलं आहे.

टेलिग्राफची बोलताना गांगुली म्हणाला, 'लॉकडाऊन लावण्यात आलं तरं चांगलं आहे, कारण आजूबाजूला जास्त माणसं नसतील. काही लोकांवरच लक्ष द्यावं लागेल जे बायो-बबलमध्ये आहेत. त्यांचं वारंवार टेस्टिंगही केलं जात आहे. जेव्हा तुम्ही बायो-बबलमध्ये जाल तेव्हा काही होऊ शकत नाही. मागच्यावर्षी युएईमध्ये स्पर्धा सुरू होण्याआधीही अशा घटना घडल्या होत्या. एकदा स्पर्धा सुरू झाल्यानंतर गोष्टी नीट होतील.'

मुंबईमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं तरी काही अडचणी येणार नाहीत, कारण आम्ही सरकारकडून मॅचच्या आयोजनासाठी आधीच परवानगी घेतली आहे, असंही गांगुलीने सांगितलं.

First published:

Tags: Cricket news, IPL 2021, Mumbai